अभिमानास्पद! आशियात पहिल्यांदा कोरोनाग्रस्तावर फुफ्फुसाचं यशस्वी प्रत्यारोपण

अभिमानास्पद! आशियात पहिल्यांदा कोरोनाग्रस्तावर फुफ्फुसाचं यशस्वी प्रत्यारोपण

अवयव दान श्रेष्ठ दान असं म्हटलं जातं. या 34 वर्षीय तरुणाचे अवयव त्याच्या मृत्यूनंतर वेगवेगळ्या रुग्णालयात दान केले आहे.

  • Share this:

चेन्नई, 29 ऑगस्ट : कोरोनाच्या काळात पहिल्यांदाच भारताच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णावर फुफ्फुसाचं यशस्वीपणे प्रत्यारोपण करण्यात आलं आहे. चैन्नईमधील मल्टी-स्पेशियलिटी रुग्णालयात (MGM) हेल्थ केअरमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णावर फुफ्फुसाचं यशस्वी प्रत्यरोपण करण्यात आलं आहे.

आशियामध्ये पहिल्यांदाच कोरोनाग्रस्तावर अशी शस्रक्रिया करण्यात आली आहे. चेन्नईतील डॉक्टरांच्या टीमनं ही शस्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. आशियात पहिल्यांदाच दुहेरी फुफ्फुस प्रत्यारोपण (double lung transplantation) करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

रुग्णालयातील शस्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार हे फुफ्फुस दिल्लीहून चेन्नईला आणण्यात आलं त्यानंतर कोरोनाग्रस्त रुग्णावर त्याचं प्रत्यारोपण करण्यात आलं आहे. फुफ्फुस दान करणारा व्यक्ती 34 वर्षांचा होता. मेंदू कार्य करायचा बंद झाल्यामुळे अपोलो ग्लेनेगल्स ग्लोबल रुग्णालयात मृत घोषित करण्यात आलं. आपले अवयव दान करण्यात यावेत असं मृत्यूआधी त्यानं डॉक्टरांना सांगितलं होतं.

हे वाचा-अंदमानातल्या अतिदुर्मिळ जमातीला Corona चा धोका; 53 पैकी 10 जण संक्रमित

या तरुणानं आपले इतर अवयवही दान केले

अवयव दान श्रेष्ठ दान असं म्हटलं जातं. या 34 वर्षीय तरुणाचे अवयव त्याच्या मृत्यूनंतर वेगवेगळ्या रुग्णालयात दान करण्यात आले आहेत. रुग्णालयातील एका डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार 48 वर्षांच्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. याच दरम्यान त्याचे फुफ्फुस खराब झाल्याचं अहवालात समोर आलं. गाझियाबाद इथे त्यांना उपचारादरम्यान व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.

हे वाचा-17 वर्षांपासून तरुणाच्या डोक्यात वळवळत होता 5 इंचाचा किडा, डॉक्टरही झाले हैराण

48 वर्षीय व्यक्तीची प्रकृती खालवल्यानं 20 जुलै रोजी त्याला चैन्नईतील ECMO रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या रुग्णालयात एकाच वेळी हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपणाची यशस्वी शस्रक्रिया करण्यात आली आहे. दुहेरी फुफ्फुस प्रत्यारोपणाची ही आशियातील पहिली शस्रक्रिया असल्याचं सांगितलं जात आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 29, 2020, 9:32 PM IST

ताज्या बातम्या