मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

मृत्यूतांडव! कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून सर्वात भयंकर ठरले गेले 54 दिवस

मृत्यूतांडव! कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून सर्वात भयंकर ठरले गेले 54 दिवस

कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून पहिल्यांदाच अशी भयंकर स्थिती दिसून आली आहे.

कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून पहिल्यांदाच अशी भयंकर स्थिती दिसून आली आहे.

कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून पहिल्यांदाच अशी भयंकर स्थिती दिसून आली आहे.

  • Published by:  Priya Lad

नवी दिल्ली, 24 मे : एकिकडे देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी (Coronavirus in India) झाल्याचं केंद्र सरकार सांगतं आहे. त्यामुळे देशात कोरोनाची स्थिती दिलासादायक असल्याचं दिसतं आहेय पण दुसरीकडे मात्र चिंताजनक अशी बातमी आहे. कोरोनाची दुसरी किती भयंकर ठरत आहे, याचं धक्कादायक चित्र केंद्र सरकारच्या आकडेवारीवरूनच समोर आलं आहे. कोरोनाची दुसरी लाट (Corona second wave) ही जीवघेणी ठरत आहे. फक्त  2 महिन्यांतच 46% कोरोना बळी गेले (Corona death in india) आहेत.

कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून मे, 2021 हा जीवघेणा महिना ठरला आहे. 1 ते 24 मे  कोरोनामुळे 95,390 मृत्यू झाले आहे. एकूण मृत्यूच्या हा दर 31.41 टक्के आहे. तर मे महिन्यातील मृत्यूचं प्रमाण हे एप्रिलमधील मृत्यूच्या प्रमाणापेक्षाही दुप्पट आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल 60 टक्क्यांनी प्रकरणं वाढली आहेत तर 5 महिन्यांत मृत्यू 4 टक्क्यांनी वाढला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतात आतापर्यंत एकूण 3,03,720 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 1 एप्रिलला 1.40 लाखांपेक्षा जास्त मृत्यूची नोंद होती. मे महिन्यात आतापर्यंत 95,390 मृत्यू झाले आहेत. एकूण मृत्यूच्या हे प्रमाण 31.41 टक्के आहे.  तर एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात दुप्पट मृत्यू झाले आहेत. एप्रिलमध्ये 45,862 मृत्यूची नोंद होती. मे महिन्यात सोमवारपर्यंत  95,390 मृत्यूची नोंद झाली आहे.

हे वाचा - 'या' 5 जिल्ह्यांत घटला कोरोना रुग्णांचा आकडा; पाहा यात तुमचा जिल्हा आहे का?

2 ऑक्टोबरला भारतात एक लाख कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. 28 एप्रिलला हा आकडा 2 लाखांच्या वर गेला. याचा अर्थ 208 दिवसांनी आणखी मृत्यूसंख्या एक लाखांवरून दोन लाखांवर पोहोचली. पण यानंतर दोन लाख ते तीन लाखांचा आकडा हा फक्त 27 दिवसांत पार झाला आहे.

2020 सालात भारतात  1.02 कोटी कोरोना रुग्ण होते. तर  1.48 लाख रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. पण 2021 मध्ये अवघ्या 5 महिन्यांतच रुग्ण आणि मृत्यूचा आकडा अनुक्रमे 1.64 कोटी आणि 1.54 लाखांवर पोहोचला.  एकूण मृत्यूच्या 46 टक्क्यांपेक्षाही जास्त मृत्यू फक्त एप्रिल-मेमध्येच झाले आहेत, अशी माहिती केंद्र सरकारच्या आकडेवारीवरून मिळते आहे. कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून अमेरिका, ब्राझीलनंतर भारतातच 3 लाखांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत.  यावरूनच कोरोनाची दुसरी लाट ठरतेय जीवघेणी ठरते आहे हे दिसतं.

हे वाचा - Maharashtra corona update : सलग दुसऱ्या दिवशी दिलासा! नीचांकी रुग्णसंख्या

फक्त मृत्यूच नव्हे तर एप्रिल-मे या दोन महिन्यांतील रुग्णसंख्येतील वाढही लक्षणीय आहे. भारतात आतापर्यंत 2.67 कोटी रुग्ण आढळले. त्यापैकी 1.45 कोटी रुग्ण एप्रिलपासून आतापर्यंत सापडले आहेत. याचा अर्थ एकूण प्रकरणांच्या 54.32 टक्के प्रकरणं एप्रिल-मे या दोन महिन्यांतच सापडले आहेत.  फक्त मे महिन्यातच 79.89 लाख रुग्ण आढळले. .  एप्रिलमध्ये  64.81 लाख कोरोना प्रकरणं होती. मे महिन्यात आतापर्यंत हा आकडा 79.89  पोहोचला आहे. या कालावधीत  23 टक्क्यांपेक्षा जास्त कोरोना प्रकरणांची नोंद झाली. तर मे महिन्यात आढळलेल्या रुग्णांचं प्रमाण हे एकूण  प्रकरणांच्या 30 टक्के आहे.

First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus