धक्कादायक! कोरोना व्हायरसमुळे डोक्यावर होतोय परिणाम...रिकव्हरीनंतरही भीती

धक्कादायक! कोरोना व्हायरसमुळे डोक्यावर होतोय परिणाम...रिकव्हरीनंतरही भीती

केवळ फुफ्फुसांवर हल्ला होणारा व्हायरस शरीराच्या जवळजवळ सर्व भागांवर परिणाम करतो.

  • Share this:

मुंबई, 10 जुलै: चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोनानं जगभरात हाहाकार पसरवला आहे. या कोरोनाचा इम्युनिटी पावर कमी असणाऱ्या अनेक लोकांच्या शरीरावर दीर्घकाळ परिणाम दिसून येत असल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय कोरोना आपलं रुप टप्या-टप्याने बदलत असल्याचंही दिसून येत आहे. जगात कोरोनाग्रस्तांचा आकड्यानं 1 कोटी 23 लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

कोरोना विषाणूबद्दल बर्‍याच गोष्टी समोर येत आहेत. सुरुवातीला, केवळ फुफ्फुसांवर हल्ला होणारा व्हायरस शरीराच्या जवळजवळ सर्व भागांवर परिणाम करतो. गंभीर प्रकरणांमध्ये त्याचा मेंदूवर परिणाम होतो. मेंदूची काम करण्याची क्षमता कमी होत जाते किंवा बऱ्याजवेळा मेंदू काम करणं बंद करत असल्याचं समोर आलं आहे. नुकत्याच जर्मनीमध्ये झालेल्या अभ्यासानुसार कोरोनाबाबत आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाचे विषाणू मेंदूपर्यंत कसे पोहोचतात आणि त्याचा परिणाम काय होऊ शकतो हे या अभ्यासातून समोर आलं आहे.

कोरोनाचा संसर्ग झालेले आणि प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांमध्ये अनेक समस्या दिसून आल्या आहेत. थरथर कापणं, सतत बेशुद्ध होणं, हृदयाचे ठोके कमी जास्त होणं इत्यादी. जर्मनीमध्ये तज्ज्ञांनी 11 रुग्णांवर अभ्यास केला ज्यांची प्रकृती कोरोनामुळे खूप खालावली होती.

यामध्ये मेंदूत संबंधित सर्व लक्षणे कोरोना पेशंटमध्ये दिसली तर मेंदूत आणि स्पायनल कॉडमध्ये वाहणाऱ्या सेरेब्रोस्पाइनल फ्लुईडमध्ये कोरोना विषाणू दिसून आले नाही. या आधारावर, शास्त्रज्ञांनी असे गृहीत धरत आहेत रुग्णाच्या शरीरात स्वत:हून अॅन्टीबॉडी तयार होत आहे. यामध्ये कोरोनाचे विषाणू निरोगी पेशींवर आक्रमण कऱण्यास सुरुवात करतात

1918 रोजी स्पॅनिश फ्लू पसरल्यानंतरही 1 दशलक्ष लोकांना मेंदूशी संबंधित आजार होते. तसेच कोरोनोच्या संदर्भातही ही भीती वाढली आहे. कोरोनाची लस आल्यानंतरही नंतरही रोगातून बरे झालेल्या रूग्णांना मेंदूचे आजार किंवा मानसिक आजारांचा त्रास होईल. लंडन युनिव्हर्सिटीमध्ये कोरोना आणि मनाच्या नात्यावर 43 रुग्णांवर एक अभ्यास करण्यात आला होता.  रूग्णांवर केलेल्या अभ्यासात असे आढळले आहे की व्हायरसमुळे मेंदूच्या मज्जातंतू सूज येते. कोरोनातून बरे झाल्यावरही बहुतेकवेळा ही सूज तशीच राहाते.

Published by: Kranti Kanetkar
First published: July 10, 2020, 1:13 PM IST

ताज्या बातम्या