• Home
  • »
  • News
  • »
  • coronavirus-latest-news
  • »
  • विकेण्डला कोरोनाने मोडला रेकॉर्ड, 24 तासांत समोर आली धक्कादायक आकडेवारी

विकेण्डला कोरोनाने मोडला रेकॉर्ड, 24 तासांत समोर आली धक्कादायक आकडेवारी

शहरात सध्या 952 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 492 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

शहरात सध्या 952 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 492 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

Corona virus ने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला आहे. सर्वच देशांना याचा मोठा फटका बसला असून अमेरिकेपाठोपाठ भारतात दुसऱ्या क्रमांकाचे रुग्ण आहेत.

  • Share this:
    मुंबई, 12 सप्टेंबर : सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विकेण्डला धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 24 तासांत देशात तब्बल 97 हजार 570 लोकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे. ब्राझिलला मागे टाकत भारत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. आतापर्यंत देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 46 लाखांवर पोहोचली आहे. देशात 9 लाख 58 हजार 316 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर कोरोनाग्रस्तांचा आतापर्यंतचा देशातील आकडा 46 लाखावर पोहोचला आहे. कोरोनाममुळे गेल्या 24 तासांत 1 हजार 201 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 77,472 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 36 लाख 24 हजार 197 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. हे वाचा-रुग्णसंख्या जास्त, पण मृत्यूदर सर्वात कमी; या आकड्यांमागची खरी गोष्ट Corona virus ने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला आहे. सर्वच देशांना याचा मोठा फटका बसला असून अमेरिकेपाठोपाठ भारतात दुसऱ्या क्रमांकाचे रुग्ण आहेत. भारताचा कोरोना मृत्यूदर हा 1.7% असून अमेरिकेमध्ये तो 3% तर ब्रिटनमध्ये 11.7% आणि इटलीमध्ये 12.6% आहे. भारतात यशस्वीपणे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे भातातील रिकव्हरी रेट चांगला असला तर दिवसाला नवीन वाढणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला 64 लाख (64,68,388) लोक कोरोना विषाणूच्या धोक्यामध्ये होते असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जवळपास 95 हजार दररोज नवीन लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत.
    Published by:Kranti Kanetkar
    First published: