धक्कादायक! देशात 24 तासांत 98 हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद

धक्कादायक! देशात 24 तासांत 98 हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद

कोरोनाविरुद्ध लढा देत असताना भारतात सप्टेंबर महिन्यात मात्र खूपच चिंताजनक स्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

  • Share this:

मुंबई, 17 सप्टेंबर : सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते असा अंदाजही अनेकांनी व्यक्त केला आहे. साधारण दर दिवसाला कोरोनाचे 85 ते 95 च्या आसपास नवीन लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या नवीन आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासांत 97 हजार 894 लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

देशातील कोरोनाचा आतापर्यंतचा आकडा 50 लाख पार झाला असून 51 लाख 18 हजार 254 रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे 24 तासांत 1 हजार 132 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांचा आकडा 83 हजार 198 वर पोहोचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनातून बरे झालेल्या लोकांची संख्याही 40 लाखांहून अधिक आहे. आतापर्यंत 40 लाख 25 हजार 80 रुण बरे झाले असून बुधवारी विक्रमी 82 हजार 922 लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. देशात सध्या 10 लाख 9 हजार 976 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

हे वाचा-Coronavirus : भारतात कोरोनाची दुसरी लाट येणार? जाणून घ्या सत्य

कोरोनाविरुद्ध लढा देत असताना भारतात सप्टेंबर महिन्यात मात्र खूपच चिंताजनक स्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. मृत्यूदर आणि रिकव्हरी रेट चांगला असला तरीही कोरोनाची लागण होण्याचा दर दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात 15 दिवसांमध्ये 13 लाख 08 हजार 991 नवीन रुग्ण सापडले आहेत. ब्राझिलला मागे टाकत अमेरिकेनंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

हे वाचा-ठरलं! भारतात दिली जाणार रशियन लस; ट्रायलसाठी भारतीय कंपनीने केला करार

15 दिवसांत भारतात जवळपास 16 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महाराष्ट्रात बुधवारी राज्यात 474 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारच्या तुलनेत ही संख्या कमी असली तरी बुधवारी राज्यात 23365 नवीन कोरोना रुग्णांचे निदान करण्यात आले आहे. हा आकडा गेल्या काही दिवसांच्या तुलनेत जास्त आहे.

हे वाचा-मोठी बातमी! अमित शहांनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोरोना पॉझिटिव्ह

बुधवारी 474 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.75 % इतका आहे. बुधवारी 17559 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यात बुधवारपर्यंत एकूण 792832 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 70.71 टक्के इतका झाला आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 17, 2020, 9:57 AM IST

ताज्या बातम्या