देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 59 लाखांहून जास्त, वाचा 24 तासांतली आकडेवारी

देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 59 लाखांहून जास्त, वाचा 24 तासांतली आकडेवारी

कोरोनाग्रस्तांचा आतापर्यंचा आकडा 59 लाख 92 हजार 533 वर पोहोचला आहे.

  • Share this:

मुंबई, 27 सप्टेंबर : देशात कोरोनाचे नवीन रुग्ण सप्टेंबर अखेरीला कमी आढळून येत आहेत. 93 ते 97 हजाराच्या आकड्यावरून आता जवळपास 90 च्या अलिकडे आली असल्यानं दिलासा देणारी गोष्ट आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार 24 तासांत 88 हजार 600 नवीन लोकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर 1 हजार 124 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांचा आतापर्यंचा आकडा 59 लाख 92 हजार 533 वर पोहोचला आहे.

भारतात सध्या 9 लाख 56 हजार 402 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 49 लाख 41 हजार 628 लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशात 94 हजार 503 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका ब्राझिलच्या तुलनेत भारतात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक वाढत आहेत. अमेरिका पहिल्या तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे.

हे वाचा-धक्कादायक! पाच दिवस मृतदेह घरात होता कुजत; नातवाला मात्र आजीच्या सोन्याची चिंता

महाराष्ट्रात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णसंख्येने शनिवारी 10 लाखांचा टप्पा ओलांडला. दिवसभरात 23 हजार 644 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे राज्यभरात आतापर्यंत 10 लाख 16 हजार 450 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात आज 20 हजार 419 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 430 जणांचा मृत्यू झाला. राज्यातल्या कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या ही 13 लाख 21 हजार 376 एवढी झाली आहे. राज्यात सध्या 2 लाख 69 हजार 119 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 27, 2020, 11:06 AM IST

ताज्या बातम्या