रिकव्हरी रेट चांगला तरी दिलासा नाहीच! वाचा 24 तासांतील धक्कादायक आकडेवारी

रिकव्हरी रेट चांगला तरी दिलासा नाहीच! वाचा 24 तासांतील धक्कादायक आकडेवारी

गेल्या 24 तासांत 1 हजार 089 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून देशात आतापर्यंत मृत्यूची आकडेवारी 93,379 वर पोहोचली आहे.

  • Share this:

मुंबई, 26 सप्टेंबर : देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या चाचण्यांची संख्या वाढवली आणि रिकव्हरी रेट चांगला असला तरीही कोरोनाच्या रुग्णांची संख्या साधारण दिवसाला 80 ते 85 हजारांच्या आसपास वाढत आहेच. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आलेल्या आकडेवारीनुसार देशात 24 तासांत 85 हजार 362 नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. देशात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 59 लाखांवर पोहोचला आहे.

गेल्या 24 तासांत 1 हजार 089 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून देशात आतापर्यंत मृत्यूची आकडेवारी 93,379 वर पोहोचली आहे. राज्यात 9 लाख 60 हजार 961 रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून आतापर्यंत 48 लाख, 49 हजार 585 रुग्णांनी कोरोनावर मात करत त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हे वाचा-'माल' घेतला नाही मग 12 वकिलांचा सल्ला कशासाठी? शर्लिनचा दीपिकाला तिखट सवाल

ICMRक़डून मिळालेल्या माहितीनुसार देशात गेल्या 24 तासांत 13,41,535 लोकांची कोरोना चाचणी घेण्यात आली. तर कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जास्तीत जास्त कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याचं लक्ष भारताचं असल्याची माहिती ICMRनं दिली आहे. गुरुवारी महाराष्ट्र, झारखंड, कर्नाटक या तीन राज्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.

महाराष्ट्रातली कोरोनाची कशी आहे आकडेवारी?

मुंबई उपनगर, ग्रामीण भाग आणि पुण्यात कोरोनाचा संसर्गाचा विळखा आणखीन घट्ट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गुरूवारी दिवसभरात कोरोनानं 459 जणांचा बळी घेतला आहे. तर 19 हजार 164 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 12 लाख 82 हजार झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 17 हजार 184 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आत्तापर्यंत 9 लाख 73 हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. पुण्यामध्ये सिंहगड रोड, वार्जे-कर्वेनगर, धनकवडी-सहकारनगर, हडपसर-मुढवा, अहमदनगर रोड-वडगाव शेरी हे 5 विभाग नव्यानं हॉटस्पॉट बनत चालले आहेत.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 26, 2020, 10:13 AM IST

ताज्या बातम्या