धक्कादायक! एका दिवसात आढळले कोरोनाचे 78 हजार नवे रुग्ण

धक्कादायक! एका दिवसात आढळले कोरोनाचे 78 हजार नवे रुग्ण

ICMR कडून मिळेल्या माहितीनुसार भारतात शनिवारी 10,55,027 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली.

  • Share this:

मुंबई, 30 ऑगस्ट : ऑगस्टच्या शेवटी कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढताना पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आलेल्या माहितीनुसार 24 तासांत देशात पहिल्यांदाच 78 हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर 948 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 35 लाख 42 हजार 734 वर पोहोचला आहे. तर मृत्यू झालेल्यांचा आतापर्यंतचा आकडा 63,498 वर पोहोचला आहे.

24 तासांत 64 हजार 935 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. केंद्रीय मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात 21. 72 टक्के कोरोनाच्या अॅक्टिव्ह केसेस आहेत. रिकव्हरी रेट 76.47 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात गेल्या 24 तासांमध्ये 12 हजार 878 अॅक्टिव्ह केसेस जास्त सापडल्याचंही आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

हे वाचा-Unlock 4.0 : नवीन गाईडलाईननुसार, काय सुरू होणार आणि काय बंद राहणार?

ICMR कडून मिळेल्या माहितीनुसार भारतात शनिवारी 10,55,027 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी 78 हजारहून अधिक लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या देशात 7 लाख 65 हजार 302 लोकांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरू आहे. रुग्ण बरे होण्याची संख्या जरी वाढत असली तर संक्रमणाची संख्या वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या महामारीने मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 30, 2020, 10:20 AM IST

ताज्या बातम्या