देशात 24 तासांत नव्या रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या अधिक, वाचा ताजे अपडेट्स

देशात 24 तासांत नव्या रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या अधिक, वाचा ताजे अपडेट्स

76 हजार 674 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनामुळे 903 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 05 ऑक्टोबर : देशात दिवसागणिक कोरोनाचा विळखा आणखीन घट्ट होत चालेला पाहायला मिळत आहे. रिकव्हरी रेट चांगला असला तरीही कोरोनाची लागण होणाऱ्यांचं प्रमाणही तितकच जास्त आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाखांच्या वर गेला आहे. गेल्या 24 तासांत 74 हजार 441 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 76 हजार 674 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनामुळे 903 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

या सगळ्यात दिलासा देणारी गोष्ट म्हणजे आतापर्यंत 55 लाख 86 हजार 704 लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर संपूर्ण देशात 9 लाख 34 हजार 427 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात मृत्यूदर 1.6 टक्क्यांवर आहे तर पंजाब, महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि पुडुचेरीमध्ये हे 2-3% आहे.

हे वाचा-अलर्ट! आता नोटांमधूनही होऊ शकतो कोरोनाचा प्रसार, RBIने दिली माहिती

महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती

कोरोना विरुद्धच्या लढाईत चिंता वाढलेली असताना रविवारी दिलासादायक आकडेवारी समोर आली. सलग दोन दिवस कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. रविवारी 15 हजार 48 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर राज्यात 13 हजार 702 नवे रुग्ण आढळून आलेत. तर दिवसभरात 326 जणांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या 2 लाख 55 हजार 281 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रविवारी रुग्णांची एकूण संख्या ही 14 लाख 43 हजार 409 एवढी झाली आहे. मुंबईतला रुग्णांचा आकडा हा वाढलेला असून दिवसभरात 2 हजार 109 एवढे नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 48 जणांचा मृत्यू झाला.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 5, 2020, 10:01 AM IST

ताज्या बातम्या