Home /News /coronavirus-latest-news /

कोरोनानं मोडला मागच्या 15 दिवसांचा रेकॉर्ड, 24 तासांत जवळपास 70 हजार नवे रुग्ण

कोरोनानं मोडला मागच्या 15 दिवसांचा रेकॉर्ड, 24 तासांत जवळपास 70 हजार नवे रुग्ण

आतापर्यंत 20 लाख 96 हजार 665 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

    मुंबई, 20 ऑगस्ट : कोरोनाच्या संसर्गाचा वेग वाढला असून आज पहिल्यांदाच ऑगस्ट महिन्यातला आतापर्यंतचा रेकॉर्डही 24 तासात मोडला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या मााहितीनुसार 24 तासांत 69,652 नवीन लोकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर 997 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात एका दिवसात जवळपास 62 ते 65 हजार नवीन रुग्णांची आतापर्यंत नोंद होत होती. आज मात्र गेल्या 24 तासांतील सर्वात धक्कादायक आकडेवारी आहे. 70 हजाराच्या जवळपास ही आकडेवारी जाणारी आहे. देशात आतापर्यंत कोरोनाग्रतांचा आकडा 28 लाख 36 हजार 926 वर पोहोचला आहे. त्यापैकी 6 लाख 86 हजार 395 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत देशात 53 हजार 866 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेशात कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण वाढत आहे. कोरोनामुळे एका दिवसात महाराष्ट्रात सर्वाधिक 346 पंजाबमध्ये 22, मध्य प्रदेशात 18, गुजरातमध्ये 17, उत्तराखंडमध्ये 14, जम्मू-काश्मीरमध्ये 11, बिहार, राजस्थान, हरियाणा, ओडिशा आणि आसाममध्ये 10-10, दिल्लीत 9, तेलंगण आणि गोव्यामध्ये 8-8, केरळमध्ये रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत 20 लाख 96 हजार 665 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाणही गेल्या काही दिवसांमध्ये वाढलं आहे. भारताचा रिकव्हरी रेट 64.5% वरून 73.9%. वर पोहोचला आहे. तर मृत्यू दर 1.9 टक्क्यांवर पोहोचला आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या