धक्कादायक! प्रत्येक 15 सेकंदाला होतोय एकाचा मृत्यू, कोरोनाचा महाभयंकर टप्पा

धक्कादायक! प्रत्येक 15 सेकंदाला होतोय एकाचा मृत्यू, कोरोनाचा महाभयंकर टप्पा

गेल्या 2 आठवड्यात जगभरातील आकडेवारीतून असे समोर आले आहे की, 24 तासांत 5900 लोकांचा मृत्यू झाला आहे. याचा अर्थ प्रत्येक तासाला 247 आणि प्रत्ये 15 सेकंदात एकाचा मृत्यू होत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 06 ऑगस्ट: जगभरात कोरोनाचा (Coronavirus) कहर कायम आहे. सध्या परिस्थिती एवढी बिकट आहे की, प्रत्येक 15 सेकंदाला एकाचा मृत्यू होत आहे. आतापर्यंत जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 7 लाख झाली आहे. अमेरिका, ब्राझील, भारत आणि मेक्सिको हे सर्वात जास्त प्रभावी देश आहेत. या देशांमध्ये मृतांची संख्या सर्वात जास्त आहे. अमेरिकेत आतापर्यंत 49 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर, 1 लाख 60 हजार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या 2 आठवड्यात जगभरातील आकडेवारीतून असे समोर आले आहे की, 24 तासांत 5900 लोकांचा मृत्यू झाला आहे. याचा अर्थ प्रत्येक तासाला 247 आणि प्रत्ये 15 सेकंदात एकाचा मृत्यू होत आहे.

जगभरात आतापर्यंत 7 लाख 5 हजार कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 87 लाख आहे. WHOच्या वतीने कोरोनाव्हायरसला 11 मार्च रोजी साथीचा रोग घोषित केले होते. आतापर्यंत जगभरात अमेरिका हा कोरोनाचा हॉट स्पॉट झाला आहे. येथे कॅलिफोर्निया, टेक्सास आणि फ्लोरिडासह अनेक राज्यात संक्रमणाचा प्रसार वाढत आहे. एका आकडेवारीनुसार अमेरिकेत दररोज 1000 हून अधिक संक्रमित लोक मरत आहेत.

वाचा-मोठी बातमी! कोविड-19 रुग्णालयाच्या ICU मध्ये अग्नितांडव, 8 रुग्णांचा मृत्यू

जगभरात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त रुग्ण हे ब्राझीलमध्ये आहेत. ब्राझीलमध्ये 24 तासांत 51 हजारपेक्षा अधिक नवीन रुग्ण आढळून आले. ब्राझीलमधील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 28 लाखांच्या वर गेला. येथे एकाच दिवसात 1154 रुग्णांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर ही संख्या 96,000वर गेली आहे.

वाचा-चीनमध्ये आणखी एका व्हायरसचा कहर! 7 जणांचा मृ्त्यू, 60 पेक्षा अधिक संक्रमित

चीनमध्ये कोरोनामुक्त रुग्णांचे फुफ्फुस झालं खराब

कोरोनाव्हायरसचा सर्वात आधी उद्रेक झाला तो चीनच्या वुहान शहरात. या ठिकाणी बऱ्या झालेल्या रुग्णांचा आता अभ्यास करण्यात आला आहे.कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना आरोग्याच्या काही समस्यांचा सामना करावा लागतो आहे. विशेष म्हणजे 90% टक्के रुग्णांचं फुफ्फुस खराब झालं आहे. 5% रुग्णांना पुन्हा संक्रमण झालं आहे आणि काही रुग्णांना चालतानाही त्रास होतो आहे, असं चीनमधील एका अभ्यासात दिसून आलं आहे. वुहान युनिव्हर्सिटीच्या झोंगनन हॉस्पिटलमध्ये एप्रिलनंतर बऱ्या झालेल्या सरासरी 59 वय असलेल्या 100 रुग्णांची तपासणी केली.

वाचा-रशियाची कोरोना लस किती सुरक्षित? WHO ने दिली महत्त्वाची माहिती

भारतात 19 लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी देशातील एकूण रुग्णांची संख्या 19 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. बुधवारीतब्बल 52 हजार 509 नवीन रुग्ण सापडले. तर, 857 जणांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासांत आतापर्यंतचे सर्वात जास्त निरोगी झाले. एकाच दिवसात तब्बल 51 हजार 220 रुग्ण निरोगी झाले. भारतातील कोरोना ग्राफ पाहिला तर, देशातील 10 लाखांच्या लोकसंख्येत 1377 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. देशात सध्या 19 लाख 6 हजार 613 एकूण रुग्ण आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: August 6, 2020, 8:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading