रिकव्हरी रेट चांगला तरी संसर्गाचा धोका वाढतोय, वाचा कोरोनाची ताजी आजची आकडेवारी

रिकव्हरी रेट चांगला तरी संसर्गाचा धोका वाढतोय, वाचा कोरोनाची ताजी आजची आकडेवारी

एका दिवसात जवळपास 57 हजार रुग्णांनी कोरोनाविरुद्ध यशस्वीपणे लढा दिला आहे.

  • Share this:

मुंबई, 24 ऑगस्ट : ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि आठवड्याच्या सुरुवातीला एक दिलासादायक बातमी आहे. गेल्या 24 तासांत नवीन कोरोनाचे रुग्ण शनिवारच्या तुलनेत 10 हजारनं कमी सापडले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार भारतात 61 हजार 408 नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आतापर्यं देशातील आकडा 31 लाख 06 हजार 349 वर पोहोचला आहे.

24 तासांत कोरोनामुळे 836 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत देशात 57 हजार 542 लोकांनी जीव गमावला आहे. सर्वात दिलासा देणारी गोष्ट म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत 70 हजाराच्या आसपास कोरोनाचे रुग्ण आढळत असताना आज ही संख्या कमी झाली आहे. कोरोनाची लस कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे वाचा-73 दिवसात Corona Vaccine मिळण्याचा दावा खोटा! पुण्यातून आली मोठी बातमी

देशात रविवारी दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन करण्यात आलं. यावेळी कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता अधिक असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र गेल्या 24 तासात शनिवारच्या तुलनेत गेल्या 24 तासात 9 हजारानं संख्या कमी झाल्याचं पाहायला मिऴालं आहे.

भारतात रिकव्हरी रेटही चांगला वाढत आहे. भारतात आतापर्यंत 23 लाख 38 हजार 036 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. एका दिवसात जवळपास 57 हजार रुग्णांनी कोरोनाविरुद्ध यशस्वीपणे लढा दिला आहे.

महाराष्ट्रात रविवारी 10,441 नवे रुग्ण आढळून आलेत तर 258 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 6,82,383 एवढी झाली आहे. संख्या 7 लाखांच्या जवळ गेल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तर आत्तापर्यंत 4,88,271 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 1,71,542 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट हा 71.55 एवढा झाला आहे. तर मृत्यू दर हा 3.26 एवढा आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 24, 2020, 10:05 AM IST

ताज्या बातम्या