देशात कोरोनाचा विस्फोट, सलग दुसऱ्या दिवशी धक्कादायक आकडेवारी समोर

देशात कोरोनाचा विस्फोट, सलग दुसऱ्या दिवशी धक्कादायक आकडेवारी समोर

मागच्या दोन दिवसांमध्ये कोरोनाची सर्वात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

  • Share this:

मुंबई, 31 जुलै: कोरोनाच्या संसर्गाचा वेग वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. मागच्या दोन दिवसांमध्ये सर्वाधिक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. देशात कोरोनाचा रिकव्हरी रेट चांगला असला तरीही संसर्ग होण्याचं प्रमाण दुप्पट वाढलं आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस जवळपास 45 ते 55 हजार नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात 24 तासांत कोरोनाची नवीन धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 24 तासात जवळपास 6 लाखाहून अधिक लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली त्यापैकी 55 हजार 78 लोकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

देशात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 16 लाखावर पोहोचला आहे. त्यापैकी जवळपास 5 लाख 45 हजार 318 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर 24 तासात कोरोनामुळे 779 रुग्णांचा मृत्यू झाला असून देशात आतापर्यंत मृतांचा आकडा 35 हजार 747 वर पोहोचला आहे.

हे वाचा-लहान मुलांकडून कोरोना संक्रमणाचा धोका जास्त, तज्ज्ञांनी सांगितले धोकादायक वयोगट

हे वाचा-EXCERCISE करण्याआधी की नंतर; नाश्ता करण्याची योग्य वेळ कोणती?

देशात आतापर्यंत 10 लाख 57 हजारहून अधिक रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात 0 ते 1 लाख रुग्णांची संख्या पोहोचण्यासाठी 110 दिवसांचा आवधी लागला. 1 ते 2 लाख होण्यासाठी 15, 2 ते 3 लाख होण्यासाठी 10, 3 ते 4 लाख होण्यासाठी 8, 4 ते 5 लाख होण्यासाठी 6 दिवसांचा अवधी लागला. धक्कादायक बाब म्हणजे 5 लाख ते 16 लाखांपर्यंत रुग्णांचा टप्पा हा 5 दिवसांवरून दोन दिवसांपर्यंत आला आहे.

24 तासात साधारण 50 ते 55 हजार नवीन रुग्णांची नोंद होत आहे. याचा अर्थ दोन दिवसांत एक लाख रुग्णसंख्या होत आहे. साधारण आकडेवारीवरून आपण अंदाज लावून शकतो की किती वेगानं या संक्रमणाचा वेग वाढला आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: July 31, 2020, 9:33 AM IST

ताज्या बातम्या