मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /ऑगस्ट महिन्यात सर्वात जास्त वाढली कोरोनाची भीती, वाचा कसा आहे ग्राफ

ऑगस्ट महिन्यात सर्वात जास्त वाढली कोरोनाची भीती, वाचा कसा आहे ग्राफ

देशात कोरोनाचा कहर, 24 तासांत 60 हजारहून अधिक लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

देशात कोरोनाचा कहर, 24 तासांत 60 हजारहून अधिक लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

देशात कोरोनाचा कहर, 24 तासांत 60 हजारहून अधिक लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

मुंबई, 16 ऑगस्ट : कोरोनाचं जगभरात थैमान सुरू आहे. भारतात रिकव्हरी रेट चांगला असला तरीही दर दिवसाला कोरोनाचे नवीन रुग्ण सापडण्याचं प्रमाण मात्र जास्त आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 25 लाख 89 हजार 682 वर पोहोचला आहे.

24 तासांत तब्बल 63 हजार 489 नवीन लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून 944 रुग्णांचा कोरोनामुळे भारतात मृत्यू झाला आहे. सध्या कोरोनाच्या 6 लाख 77 हजार 444 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत मृतांचा आकडा 50 हजाराच्या जवळ पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत 944 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण 49,980 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हे वाचा-खाण्याच्या पॅकेटमधून तुमच्या घरामध्ये पोहोचतोय कोरोना? WHO ने दिले हे स्पष्टीकरण

महाराष्ट्रात शनिवारी 12, 614 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली तर 322 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 5,84,754 वर पोहोचला आहे. जगात भारताचा तिसरा तर देशात महाराष्ट्राचा कोरोनाच्या रुग्णांमध्ये पहिला क्रमांक आहे.

कोरोनातून आतापर्यंत बरे होणाऱ्यांची एकूण संध्या 18 लाख 62 हजार 258 आहे. सलग 12 दिवस कोरोनाच्या नवीन रुग्णांची आकडेवारी ही रेकॉर्डब्रेक आहे. इतर देशांच्या तुलनेत ही आकडेवारी खूप जास्त असल्याचं एका अहवालानुसार सांगण्यात आलं आहे. तर भारतात मृत्यूदर कमी झाला आहे. 1 ते 15 ऑगस्टपर्यंत केवळ दोनच दिवसांत मृत्यूदराची सर्वाधिक नोंद करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

First published:
top videos

    Tags: Coronavirus