ठाणे, 19 मे : मदत करण्याची इच्छा असेल तर कोणत्याही प्रकारची मदत निस्वार्थी आणि फायदा न पाहाता केली जाऊ शकते. याचं उत्तम उदाहरण समोर आलं आहे. एका रिक्षा चालकानं आपल्या लग्नासाठी साठवलेले 2 लाख रुपये कोरोनाच्या महासंकटात गरजूंच्या मदतीसाठी वापरले आहेत. हे पैसे त्यानं आपलं लग्न चांगल्या पद्धतीनं कऱण्यासाठी साठवले होते. मात्र कोरोनाचं संकट आलं आणि लॉकडाऊन सुरू झाला. या लॉकडाऊनमुळे त्याचं लग्न होऊ शकलं नाही पण तरुणानं ते 2 लाख रुपये अनोख्या पद्धतीनं मदत करत गरजूंना वापरले आहेत.
30 वर्षांच्या अक्षय कोठावळे या तरुणानं अनोखं कोरोनाच्या महासंकटात एक अनोखा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. लग्नासाठी साठवलेले पैशातून अक्षय गरीब, मजूर आणि वृद्ध-गर्भवती महिलांची मदत करत आहे. याशिवाय वृद्ध रूग्ण आणि गर्भवती महिलांना विनाशुल्क रिक्षातून रुग्णालयात पोहोचवण्याचं काम करत आहे. 25 मे रोजी अक्षयच्या लग्नाची तारीख ठरली होती त्यासाठी त्यानं पैसेही साठवले पण लॉकडाऊन वाढल्यानं विवाह तात्पुरता पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
हे वाचा-आजपासून पुण्यातलं सगळ्यात मोठं मार्केट बंद, कोरोनाच्या उद्रेकामुळे निर्णय
''मी लोकांना रस्त्यावर हालाकीचं जीवन काढताना पाहिलं. त्यांना नीट अन्नही मिळत नव्हतं. कोणत्याही परिस्थितीत जगण्यासाठी त्यांची केवीलवाणी धडपड मला दिसत होती. हे दृश्यं पाहून मी मनातून हादरून गेलो आणि काही मित्राच्या सोबतीनं मी या लोकांची मदत कऱण्याचा निर्णय घेतला.''
अक्षय ठाण्यातील टिंबर बाजार इथे राहातो. त्यानं आपल्या मित्रांची मदत घेऊन भुकेलेल्यांना पोळी-भाजी वाटण्याचं काम सुरू केलं. याशिवाय मजूर आणि गरजूंना खायला देण्याची मदत केली आणि वृद्ध आणि गर्भवतींना आपल्या रिक्षातून रुग्णालयात पोहोचवण्यासाठी. त्याला या कामात मित्रांचं सहकार्य लाभल्याचं अक्षयनं सांगितलं. त्याच्या कामाचं सोशल मीडियावर तुफान कौतुक केलं जात आहे.
हे वाचा-वॉचमनची नोकरी करायचा हा बॉलिवूड सुपरस्टार, दोन वेळचं जेवण मिळणंही होतं कठीण
संपादन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Coronavirus symptoms