मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

जागतिक बँकेने दिला इशारा : Corona मुळे जगभरातील 15 कोटी नागरिक गरिबीच्या खाईत

जागतिक बँकेने दिला इशारा : Corona मुळे जगभरातील 15 कोटी नागरिक गरिबीच्या खाईत

जगभरातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या मोठा फटका बसला आहे. कोट्यवधी नागरिक बेरोजगार आले आहेत. त्याचं भीतीदायक चित्र जागतिक बँकेने (World bank) उभं केलं आहे.

जगभरातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या मोठा फटका बसला आहे. कोट्यवधी नागरिक बेरोजगार आले आहेत. त्याचं भीतीदायक चित्र जागतिक बँकेने (World bank) उभं केलं आहे.

जगभरातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या मोठा फटका बसला आहे. कोट्यवधी नागरिक बेरोजगार आले आहेत. त्याचं भीतीदायक चित्र जागतिक बँकेने (World bank) उभं केलं आहे.

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी

वॉशिंग्टन डीसी, 7 ऑक्टोबर : कोरोनाने (Coronavirus) जगभर थैमान घातलं आहे. आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला असून दररोज हजारो रुग्ण सापडत आहेत. त्याचबरोबर जगभरातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या मोठा फटका बसला आहे. कोट्यवधी नागरिक बेरोजगार आले आहेत. त्यानंतर आता जागतिक बँकेने नवीन भीती व्यक्त केली आहे. यामुळे आणखी मोठा फटका बसणार आहे. कोरोनाच्या या संकटामुळं जगभरातील 150 मिलियन  म्हणजेच 15 कोटी नागरिक (15 million people in poverty) गरिबीच्या संकटात अडकणार असल्याचं मत जागतिक बँकेने (World Bank) व्यक्त केलं आहे. जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालापास ( David Malpass) यांनी ही भीती व्यक्त केली आहे.

कोरोनाच्या या संकटाचा जगातील विविध राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेवर देखील परिणाम होणार आहे. यासाठी सर्व देशांनी तयारी करायला हवी. मोठ्या प्रमाणात फटका बसणार असल्यानं रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्याचं आव्हानदेखील या देशांसमोर असल्याचं जागतिक बँकेनं म्हटलं आहे. या वर्षीच्या अखेरपर्यंत 88 ते 11.5 कोटी नागरिक गरिबीच्या संकटात अडकणार आहेत. तर पुढील वर्षी म्हणजेच 2021 मध्ये 15 कोटी नागरिकांना याचाही फटका बसणार आहे. जागतिक बँकेच्या डेटानुसार त्यांनी भीती व्यक्त केली आहे. भारतात देखील अतिशय वाईट परिस्थिती असल्याचं मत जागतिक बँकेनं व्यक्त केलं आहे. जगातील मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारतालादेखील यामुळे फटका बसला आहे. भारतासंदर्भातील डेटा सध्या  उपलब्ध नाही. त्यामुळे भारतातील अंदाज जागतिक बँकेने वर्तवलेला नाही. कोरोना संकटाचा फटका भारताला देखील बसला असल्याचं मत यावेळी जागतिक बँकेनं व्यक्त केलं आहे.

मुंबईतील धारावीमधील झोपडपट्टीत कोरोनाचा मोठा उद्रेक झाला होता. पण डॉक्टर आणि स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे हा आटोक्यात आला. मे महिन्याच्या तुलनेत जुलै 2020 मध्ये या ठिकाणी होणाऱ्या रुग्णवाढीमध्ये जवळपास 20 टक्के घट झाल्याचं देखील जागतिक बँकेनं म्हटलं आहे. 1.4 टक्क्यापेक्षा अधिक नागरिकांना या संकटाचा मोठा फटका बसणार असून त्यांची अवस्था अत्यंत दयनीय होणार आहे. Johns Hopkins Coronavirus Resource Center ने दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील 35 कोटी नागरिकांना कोरोनाचा फटका बसला आहे. तर 10 लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, चीनच्या वुहान शहरातून आलेल्या या विषाणूने अमेरिकेत सर्वात जास्त धुमाकूळ घातला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 75 लाख नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून 2 लाख 10 हजारांहून अधिक नागरिकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आणखी किती मोठा फटका बसणार याची सर्वच देशांना चिंता आह

First published:

Tags: Coronavirus