मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Alert! Omicron पेक्षाही खतरनाक नवा Corona variant XE; WHO नेही व्यक्त केली चिंता

Alert! Omicron पेक्षाही खतरनाक नवा Corona variant XE; WHO नेही व्यक्त केली चिंता

Corona XE recombinant (Ba.1-Ba.2) 19 जानेवारी रोजी प्रथम UK मध्ये आढळून आला आहे, WHO ने या आठवड्याच्या सुरुवातीला प्रसिद्ध केलेल्या अहवालात याविषयी माहिती दिली आहे. तेव्हापासून 600 पेक्षा अधिक या प्रकारच्या विषाणू प्रकाराच्या रुग्णांची नोंद झाली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 02 एप्रिल : वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) कडून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूचा आणखी एक नवीन म्यूटेंट सापडला आहे. याला XE असं म्हटलं जात आहे. हा प्रकार Omicron च्या BA.2 सबवेरियंटपेक्षा सुमारे दहा टक्के जास्त संसर्गजन्य असल्याचे दिसून आलं आहे. ओमिक्रॉनचा BA.2 सबवेरियंट हा कोविड-19 चा आतापर्यंतचा सर्वात संसर्गजन्य प्रकार होता. जगातील अनेक देशांमध्ये त्याचा प्रसार होत आहे. हा प्रकार यूएसमध्ये नवीन COVID-19 प्रकरणांच्या प्रसारासाठी जबाबदार मानला जात आहे.

कोरोना विषाणूचा नवीन XE प्रकार Omicron च्या दोन BA.1 आणि BA.2 प्रकारातून बनलेला आहे. हा सध्या जगात काही थोड्याच भागांमध्ये दिसून आलेला आहे.

XE कुठे सापडला?

"Xe recombinant (Ba.1-Ba.2) 19 जानेवारी रोजी प्रथम UK मध्ये आढळून आला आहे, WHO ने या आठवड्याच्या सुरुवातीला प्रसिद्ध केलेल्या अहवालात याविषयी माहिती दिली आहे. तेव्हापासून 600 पेक्षा अधिक या प्रकारच्या विषाणू प्रकाराच्या रुग्णांची नोंद झाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, हा नवीन उप-प्रकार ba.2 पेक्षा 10 टक्के जास्त संसर्गजन्य आहे. मात्र, या दाव्याविषयी आणखी संशोधन होण्याची आवश्यकता आहे, असेही WHO ने म्हटले आहे.

हे वाचा - नाजूक, मुलायम ओठांसाठी या फळांपासून घरच्या-घरी बनवा Lip Balm; जाणून घ्या पद्धत

इतर प्रकार

यूके हेल्थ प्रोटेक्शन एजन्सी (यूकेएचएसए) च्या अभ्यासानुसार, सध्या तीन नवीन प्रकार प्रसारित होत आहेत. यामध्ये XD, XE आणि XF यांचा समावेश आहे.

अहवालानुसार, एक्सडी डेल्टा बहुतेक फ्रान्स, डेन्मार्क आणि बेल्जियममध्ये सापडला आहे. इम्पीरियल कॉलेज लंडनचे विषाणूशास्त्रज्ञ टॉम पीकॉक यांच्या मते, XD एकापेक्षा जास्त देशांमध्ये पसरला आहे.

हे वाचा - दातांचे प्रॉब्लेम्स सुरू झाल्यानंतर वेळ गेलेली असते, अगोदरपासूनच अशी घ्या काळजी

XE हे Omicron च्या BA.1 आणि BA.2 ने बनलेले आहे. हे यूकेमध्ये आढळले आहे आणि सामूहिक प्रसार होत असल्याचे पुरावे मिळत आहेत. त्याच वेळी XF हा Omicron च्या डेल्टा आणि BA.1 चे बनलेला आहे. तो यूकेमध्ये सापडला होता, परंतु 15 फेब्रुवारीपासून सापडला नाही.

First published:

Tags: Corona, Coronavirus, Health Tips, Lifestyle