• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • कोरोनाचा कहर! एका मुलाला मुखाग्नी देऊन घरी परतला बाप, दुसरा मृतावस्थेत आढळला

कोरोनाचा कहर! एका मुलाला मुखाग्नी देऊन घरी परतला बाप, दुसरा मृतावस्थेत आढळला

या बापाने एकाच दिवसात आपल्या दोन्ही मुलांना गमावलं आहे.

 • Share this:
  नोएडा, 14 मे : कोरोनाचा कहर आता ग्रामीण भागातही पाहायला मिळत आहे. नोएडाच्या ग्रेनो वेस्ट येथील जलालपुर गावात गेल्या 10 ते 15 दिवसात 6 महिलांसह 20 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. एकाच दिवसात दोन तरुण मुलांच्या मृत्यूनंतर वडिलांना मोठा धक्काच बसला आहे. वडील एका मुलाला मुखाग्नी देऊन घरी आले असता दुसरा मुलगा मृत असल्याचा दिसला. या घटनेनंतर बापाला मोठा हादरा बसला आहे. मुलाच्या मृत्यूचं कारण ताप असल्याचं सांगितलं जात आहे. गावकऱ्यांचं म्हणणं आहे की, सातत्याने होत असलेल्या मृत्यूनंतर देखील आरोग्य विभाग आणि प्रशासन लक्ष देत नाही. एकाला दिला मुखाग्नी आणि दुसरा मुलगा घरात मृत अवस्थेत आढळला जलालपुर गावाचे निवासी अतर सिंहचा मुलगा पंकजला अचानक ताप आला आणि त्याचा मृत्यू झाला. मुलाला मुखाग्नी देऊन घरी पोहोचले होते, की दुसरा मुलगा दीपकने जीव सोडला. दोघांना ताप आला आणि ऑक्सीजन लेवल कमी होत गेली. समाजसेवी रवींद्र भाटी यांनी सांगितलं की, 20 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. गावकऱ्यांनी सांगितलं, 28 एप्रिल रोजी त्याला ताप येण्यास सुरुवात झाली होती. दुर्देवाने त्याच दिवशी त्यांच्या दोन्ही मुलाचाही मृत्यू झाला. त्यांनी सांगितलं की, अधिकतर लोकांचा मृत्यू घरातच झाला आहे. पहिल्यांदा त्यांना ताप आला आणि ऑक्सिजन लेवल कमी होत गेला. सातत्याने झालेल्या मृत्यूनंतर ग्रामीण भागात दहशत पसरली आहे. त्यांनी सांगितलं की, गावात असं एकही घर नाही, जेथए आजारी लोक नाहीत. हे ही वाचा-PM Care फंडातील 400 व्हेंटिलेटर्स धूळखात, राज्य सरकारचं घृणास्पद राजकारण" रविंद्र भाटी यांनी सांगितलं की, 12 हून अधिक लोक अद्याप रुग्णालयात दाखल आहे. कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर जिल्हा प्रशासलाना अद्याप जाग आलेली नाही. अनेक गावात कॅम्प लावून कोरोनाची चाचणी करण्याची मागणी केली जात आहे. त्यांनी सांगितलं की, अधिकतर मृत्यू ऑक्सिजन लेवल कमी होणे आणि बेड, व्हेंटिलेटर न मिळाल्याने झाली आहेत. दुसरीकडे डीएम सुहास एलवाइ म्हणाले की, गावात सॅनिटायजेशन काम सुरू आहे. सोबतच आरोग्य विभागाच्या टीमलाही अलर्ट करण्यात आलं आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: