Home /News /coronavirus-latest-news /

कोरोनाच्या भीतीने कर्मचाऱ्यांचे कामात मन लागेना; तणाव वाढत असल्याचे सर्वेक्षणातून उघड

कोरोनाच्या भीतीने कर्मचाऱ्यांचे कामात मन लागेना; तणाव वाढत असल्याचे सर्वेक्षणातून उघड

जर बॉस हा खरच समजून घेणारा असेल तर कर्मचाऱ्यांची समस्या नियंत्रणात येऊ शकते

    वॉशिंग्टन, 16 ऑक्टोबर : सध्या जगभर थैमान घालत असलेला कोविड-19 लोकांना स्वत:च्या मृत्यूबाबत विचार करायला भाग पाडत आहे. संशोधनातून असे समोर आले आहे की यामुळे लोकांमध्ये ताणतणाव वाढत आहे. आणि यामुळेच त्यांचा कामातील सहभाग कमी होताना दिसत आहे. जर बॉस हा खरच समजून घेणारा असेल तर तो आपल्या कर्मचाऱ्यांचा कोविड-19 मुळे होणारा तणाव कमी करण्यासाठी आणि त्यांचे कामातील लक्ष वाढवण्यासाठी मदत करू शकतो. चीन आणि अमेरिकेमध्ये होत असलेला हा अभ्यास जर्नल ऑफ अप्लाइड सायकॉलॉजी मध्ये प्रकाशित करण्यात आला. या संशोधनातील प्रमुख लेखिका जिया हू म्हणाल्या की, "जागतिक साथीचा रोग काही लोकांना त्यांच्या मृत्यूबद्दल विचार करण्यास प्रवृत्त करतो त्या तणावामुळे त्यांच्या कामातील सहभाग कमी होत आहे. " जिया हू या ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीच्या फिशर कॉलेज ऑफ बिझनेसमध्ये व्यवस्थापन आणि मानवी संसाधन या विषयाच्या प्राध्यापक देखील आहेत. चीनमधील आयटी कंपनीतील 163 कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होतो याचाही अभ्यास करण्यात आला. देशात covid-19 वाढत असताना काम करणारे हे कर्मचारी दिवसातून दोनदा सर्वे भरण्याचे काम करतात. covid-19 दरम्यान काम करायला लागल्यामुळे कर्मचाऱ्यांनामधील चिंता आणि स्वतःच्या मृत्यूबद्दल वाटणारी भीती वाढत असून त्याचा कामावर परिणाम होतो हे लक्षात येत आहे. हे ही वाचा-कोरोनाची माहिती देणारे व्हिडीओ पाहताय? YouTube ने घेतला महत्त्वाचा निर्णय कर्मचाऱ्यांची वाटणारी चिंता आणि ताणतणाव याचा परिणाम त्यांच्या मालकावर ही तितकाच झाला. ज्या मालकांनी "सर्व्हंट लीडरशीप" चा अवलंब करत आपल्या कर्मचाऱ्यांकडूनकाम करून घेतलं तिथं चांगल्या पद्धतीचं काम झालं. ज्या मालकांनी आपल्या कर्मचाऱ्यांचं भावनिक दुख: समजून घेतलं त्यांचे कर्मचारी नंतर कामावर अधिक लक्ष देऊ लागले. सर्व्हेमध्ये असे दिसून आले की कर्मचाऱ्यांनी आपल्या बॉसच्या वर्तनाला 1 ते 7 या पातळीवर गुण दिले. यात सर्वांत लीडरशिप दाखवणाऱ्या बॉसला उच्च दर्जाचे मानले गेले व त्याच्या कर्मचाऱ्यांमध्ये कमी चिंता दिसून आली व त्यांची कामात सहभाग जास्त दिसून आली. प्राध्यापकांच्या म्हणण्यानुसार, नोकरांच्या नेतृत्वावर ज्या पर्यवेक्षकाची उच्च रेटिंग दिले गेले अशा पर्यवेक्षकांच्या कर्मचाऱ्यांचा कामात जास्त सहभाग दिसून आला. "सर्वंट लीडरशिप ही त्या मालकाला आपल्या कर्मचाऱ्यांकडून काम करून घेण्यासाठी प्रोत्साहन देते".  अशा प्रकारचे लीडर्स हे आपल्या कर्मचाऱ्यांना या चिंतेतून बाहेर पडण्यास मदत करतात. याचा परिणाम अमेरिकेच्या दोन संशोधनात आढळून आला आहे. पूर्णवेळ नोकरी करणाऱ्या अमेरिकन लोकांचा यात समावेश आहे. दोन्ही संशोधनात सहभागी असणाऱ्या लोकांना प्रथम covid-19 बद्दल माहिती देण्यात आली. काहींना कमी तणावपूर्ण माहिती वाचण्यासाठी देण्यात आली. ज्या कर्मचाऱ्यांनी covid-19 बद्दल अतिधोकादायक माहिती वाचली त्यांच्या चिंतेचं प्रमाण जास्त दिसून आलं. तसंच ज्या कर्मचाऱ्यांना दुसरा मजकूर दिला होता त्यांच्यात कमी चिंता दिसून आली. या अभ्यासात असे दिसून आले की कर्मचाऱ्यांना जी कंपनी मदत करत होती त्यांच्यात कमी चिंतेचे प्रमाण दिसून आले. म्हणजेच कर्मचाऱ्यांना होणाऱ्या चिंतेमध्ये कंपनी ही मुख्य भूमिका निभावत आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या