Home /News /coronavirus-latest-news /

कोरोनापासून बचाव करण्यासाठी योग्य मास्क कोणता? संशोधनात समोर आली माहिती

कोरोनापासून बचाव करण्यासाठी योग्य मास्क कोणता? संशोधनात समोर आली माहिती

कोव्हिड-19च्या (Covid-19) साथीचा प्रसार रोखण्यासाठी मास्क वापरणं, सुरक्षित अंतर राखणं आणि वारंवार हात स्वच्छ धुणं ही त्रिसूत्री प्रभावी ठरली आहे. कोरोना (Corona Virus) पासून बचाव करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा मास्क वापरायचा, याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असतात.

पुढे वाचा ...
वॉशिंग्टन, 17 डिसेंबर : कोव्हिड-19च्या (Covid-19) साथीचा प्रसार रोखण्यासाठी मास्क वापरणं, सुरक्षित अंतर राखणं आणि वारंवार हात स्वच्छ धुणं ही त्रिसूत्री प्रभावी ठरली आहे. कोरोना (Corona Virus) पासून बचाव करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा मास्क वापरायचा, याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असतात. अलीकडेच अमेरिकेतील (USA) संशोधकांच्या गटानं वेगवेगळ्या मास्कच्या फिल्टरेशन (Filtration) क्षमतेबाबत अभ्यास करून कोणता मास्क किती प्रभावी ठरतो, हे निश्चित केलं आहे. या संशोधनात असं आढळलं आहे की, काही ठराविक प्रकारचे नायलॉनचे (Nylon) मास्क कोरोना विषाणूचे वाहक असलेल्या कणांना अडवण्यात 79 टक्के प्रभावी आहेत. अमेरिकन पर्यावरण संरक्षण संस्थेच्या (US Environmental Protection Agency) सहकार्यानं नॉर्थ कॅरोलिना स्कूल ऑफ मेडिसीनमधील (North Carolina School Of Medicine) शास्त्रज्ञांनी मेडिकल मास्क पासून ते सर्वसाधारण लोक जे मास्क वापरतात, त्या सर्व मास्कपर्यंतची सुरक्षा क्षमता अभ्यासली. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रत्येक मास्कच्या सुरक्षा क्षमतेची त्यांनी कठोर निकषांवर चाचणी घेतली. मास्क लावणारी व्यक्ती कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आली तर कोणता मास्क किती सुरक्षा देतो याचाही त्यांनी अभ्यास केला. ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ अॅडमिनिस्ट्रेशननं (OSHA) निश्चित केलेल्या पद्धतीचा अवलंब केला. एकूण 12 प्रकारची सुरक्षा चाचणी करण्यात आली. एका प्रौढ पुरुषानं मास्क घालून चेहऱ्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली केल्या. त्या वेळी मास्कनं कसे आणि किती संरक्षण दिलं त्याचा अभ्यास करण्यात आला. जामा इंटरनल मेडिसीन (JAMA Internal Medicine) जर्नल मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या या संशोधनात व्यवस्थित घातलेला सुधारणा करण्यात आलेला मास्क अधिक प्रभावी ठरत असल्याचं स्पष्ट झालं आहे. मेडिकल प्रोसिजर्स दरम्यान घालण्यात येणारा कानामागे लूप असलेला मास्क ज्यांना सर्जिकल मास्क म्हटलं जातं, त्यांची फिल्टरेशन क्षमता 38.5 टक्के असल्याचा निष्कर्ष यात नोंदवण्यात आला आहे. ज्यावेळी कानामागे बांधायचे लूप घट्ट केले जातील, तेव्हा ही क्षमता 60.3 टक्क्यांपर्यंत वाढणं शक्य आहे. तसंच यात नायलॉनचा थर वाढवला तर याची क्षमता 80 टक्क्यांपर्यंत वाढू शकते, असंही शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. सर्व लोक जे मास्क वापरतात, ते डबल लेयर नायलॉन मास्क असतात. कानामागे अडकवण्यासाठी त्यांना लूप असतो. यात कोणताही वेगळा थर नसतो आणि नोज ब्रिज असतो, अशा मास्कची क्षमता 79 टक्के असते. तर डबल लेयर नायलॉन आणि त्यात वन नॉन वेव्हन लेयर असलेल्या मास्कची क्षमता 74.4 टक्के असते. तर कॉटनचा बँडिट स्टाईल मास्क 49 टक्के प्रभावी असतो, तीन लेयर्सचा कॉटन मास्कची क्षमता अगदी कमी म्हणजे 26.5 टक्के असल्याचं या अभ्यासात स्पष्ट झालं आहे. मेडिकल मास्कमध्ये एन 95 रेस्पिरेटर मास्क सर्वाधिक म्हणजे 98 टक्के प्रभावी असून, सर्जिकल मास्क जो त्याला असलेल्या दोऱ्यानी बांधायचा असतो तो 71.4 टक्के प्रभावी असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र हाच मास्क ज्याला लूप असतात, त्याची क्षमता 38.5 टक्के असल्याचं आढळलं आहे. याचे लूप घट्ट असतील आणि कोपरे दुमडलेले असतील, तर याची क्षमता 60.3 टक्के होईल. सर्जिकल मास्कमध्ये काही सुधारणा केल्यास त्याची फिल्टरिंग क्षमता वाढू शकते आणि हा मास्क घट्ट बसला तर त्यातून हवेतून येणाऱ्या कणांमधील विषाणू फिल्टर करण्याचे काम अधिक प्रभावीपणे होऊ शकतं. अनेक सर्वसाधारण मास्कची फिल्टरेशन क्षमता ही सर्जिकल मास्क इतकीच किंवा त्याहून अधिक आहे, हे आम्ही दाखवून दिलं आहे, असं या संशोधन अहवालाचे सहलेखक फिलीप क्लॅप यांनी सांगितलं. फिलीप क्लॅप हे युएनसी स्कूल ऑफ मेडिसीनमधील पेडियाट्रीक्स विभागाचे सहायक प्राध्यापक असून, इन्हेलेशन टॉक्झीकॉलॉजिस्ट आहेत.
First published:

पुढील बातम्या