मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

सकाळ की रात्र; लस घेण्यासाठी कोणती वेळ चांगली, वाचा सविस्तर

सकाळ की रात्र; लस घेण्यासाठी कोणती वेळ चांगली, वाचा सविस्तर

कोरोनाच्या काळात इम्युनिटी सिस्टीम (Immunity System)चांगली असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यात आता कोरोना लस घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

कोरोनाच्या काळात इम्युनिटी सिस्टीम (Immunity System)चांगली असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यात आता कोरोना लस घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

कोरोनाच्या काळात इम्युनिटी सिस्टीम (Immunity System)चांगली असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यात आता कोरोना लस घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

  • Published by:  Pooja Vichare

डबलिन, 06 जून: सध्या संपूर्ण जग कोरोना (Corona Virus) व्हायरससारख्या महामारीचा सामना करत आहेत. कोरोनाच्या काळात इम्युनिटी सिस्टीम (Immunity System) चांगली असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यात आता कोरोना लस घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे लस कधी घ्यावी जेणेकरुन त्याचा फायदा अधिक होईल, यावर संशोधन करण्यात आलं आहे. जाणून घ्या सविस्तर. झी न्यूज इंडियानं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

आपली रोगप्रतिकार शक्ती दरवेळेस समान कार्य करत असते. मात्र बऱ्याच काळापासून सुरु असलेल्या संशोधनातून असं दिसून आलं आहे की, आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती ही दिवसा आणि रात्री प्रत्यक्षपणे वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देते. आपल्या शरीराचा बॉडी क्लॉक, हे त्यामागचं कारण आहे.

बॉडी क्लॉक आणि व्हॅक्सिन

लस ही एका विशिष्ट रोगाच्या विषाणूंविरुद्ध रोगप्रतिकार शक्ती निर्माण करण्यासाठी बनली जाते. आपल्या शरीरातील बॉडी क्लाक आणि लस याचं समीकरणही तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे दिवसा लस दिली जाते. ज्यावेळी आपल्या शरीराची बॉडी क्लॉक व्यवस्थितपणे सुरु असतो.

हेही वाचा- पुणेकरांची उकाड्यातून सुटका, पुण्यात मान्सून दाखल

सकाळी लस दिल्याचा अधिक चांगला परिणाम जाणवत आहे. त्यामुळे रोगप्रतिकार शक्तीतही फरक जाणवू लागला आहे. दिवसा लस देण्यामागचं कारण आहे की, शरीराच्या बॉडी क्लॉकनुसार आपण आपल्या झोपेवर नियंत्रण करु शकतो.

रात्रीच्या वेळेस शरीरात थकवणारं केमिकल

आपल्या शरीरातील बॉडी क्लॉक नुसार, शरीरातील पेशींच्या कार्यप्रणालीमध्ये 24-तासांची लय निर्माण होते. (ज्याला सर्कैडियन रिदम देखील म्हणतात). उदाहरणार्थ, आपले बॉडी क्लॉक सुनिश्चित करते की, रात्रीची वेळ ही फक्त झोपण्याकरिता आहे. त्यामुळे रात्र होताच आपण केवळ मेलाटोनिनचं उत्पादन करतो. हे एक प्रकराचे केमिकल असते आणि ते आपल्या शरीराला थकवते. त्यामुळे हे केमिकल आपल्याला झोपण्याची वेळ झाली याचे संकेत देत असतात.

First published:

Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus