मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

देशात Corona च्या चौथ्या लाटेचा धोका वाढला?, केंद्र सरकार निर्बंधांची घोषणा करण्याची शक्यता

देशात Corona च्या चौथ्या लाटेचा धोका वाढला?, केंद्र सरकार निर्बंधांची घोषणा करण्याची शक्यता

Corona Virus In India:  देशाची राजधानी दिल्लीत कोरोना व्हायरसच्या (corona virus)  संसर्गाची प्रकरणे (corona patients)  झपाट्याने वाढत आहेत.

Corona Virus In India: देशाची राजधानी दिल्लीत कोरोना व्हायरसच्या (corona virus) संसर्गाची प्रकरणे (corona patients) झपाट्याने वाढत आहेत.

Corona Virus In India: देशाची राजधानी दिल्लीत कोरोना व्हायरसच्या (corona virus) संसर्गाची प्रकरणे (corona patients) झपाट्याने वाढत आहेत.

  • Published by:  Pooja Vichare

नवी दिल्ली, 15 एप्रिल: देशाची राजधानी दिल्लीत कोरोना व्हायरसच्या (corona virus) संसर्गाची प्रकरणे (corona patients) झपाट्याने वाढत आहेत. आठवडाभरातच कोरोनाचे रुग्ण 150 वरून 300 च्या पुढे गेले आहेत. या संदर्भात, दिल्लीत कोरोना व्हायरसच्या (corona virus cases) प्रकरणांचा वेग आठवडाभरात दुप्पट झाला आहे. दरम्यान, गुरुवारी दिल्लीत 325 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर एकही मृत्यू झाला नाही ही दिलासादायक बाब आहे.

दरम्यान, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता, दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (DDMA) पुढील आठवड्यात 20 एप्रिल रोजी एक महत्त्वाची बैठक घेणार आहे. या बैठकीत दिल्लीतील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजना आणि मास्क न लावल्यास होणारा दंड यावर चर्चा होणार आहे.

कोरोनाच्या मागील लाटेप्रमाणेच पुन्हा एकदा शाळा-महाविद्यालयांमध्ये मुलांना संसर्ग झाल्याची प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. दरम्यन तज्ज्ञांचं म्हणणे आहे की, जरी चौथी लाट आली तरी ती फार प्राणघातक ठरणार नाही, कारण मोठ्या संख्येनं लोकांना लसीकरण करण्यात आलं आहे. त्यामुळे कोरोना जीवघेणा ठरणार नाही.

देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, ओव्हरटेकमुळे 6 जणांचा बळी

दिल्ली सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 20 एप्रिल रोजी होणाऱ्या दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. लेफ्टनंट गव्हर्नरच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत कोविडच्या सद्य परिस्थितीवर चर्चा केली जाईल. बैठकीत गरजेनुसार योग्य ती पावले उचलण्याचा निर्णय घेतला जाईल.

या बैठकीत मास्क अनिवार्य करण्याचा निर्णयही घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेषत: गर्दीच्या ठिकाणी मास्क अनिवार्य करण्याचा निर्णयही DDMA च्या बैठकीत घेतला जाऊ शकतो.

हे निर्णय घेता येतील

बाजारात मास्क अनिवार्य असू शकतो

सिनेमा हॉलमध्येही सामान, कडक निर्बंध वाढू शकतो

मेट्रोमध्येही प्रवास करताना मास्क अनिवार्य केले जाऊ शकतात

मास्क देखील कार्यालयात लागू करण्यास सांगितले जाऊ शकतात

सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे.

राजधानी दिल्लीत सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही ही दिलासादायक बाब आहे. त्याचवेळी, संसर्ग दर 2.49 टक्क्यांवरून 2.39 टक्क्यांवर आला आहे. गुरुवारी, कोरोनाचे 325 नवीन रुग्ण आढळले. तर यापूर्वी बुधवारी 299 संक्रमित आढळले होते. बुधवारी 12,022 नमुने तपासण्यात आले, तर गेल्या 24 तासांत 13,576 नमुन्यांची तपासणी करण्यात आली.

दिल्लीत एका दिवसात 4,363 जणांना बूस्टर डोस

दिल्लीत 18 वर्षांवरील लोकांना बूस्टर डोस देण्यास सुरुवात केल्यानंतर, गुरुवारी एका दिवसात खासगी रुग्णालयांमध्ये सर्वाधिक 4,363 लोकांना बूस्टर डोस देण्यात आला. यासोबतच आता बूस्टरचे डोस घेण्याचा ट्रेंड लोकांमध्ये वाढत आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने लोकांच्या बूस्टरच्या डोसमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यापूर्वी एका दिवसात 2733 लोकांना बूस्टर डोस देण्यात आला आहे.

First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus, Coronavirus cases