मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Corona चा नवा व्हेरिएंट? Omicron च्या BA.2 स्ट्रेनचा कहर; व्हेरिएंटचा तपास सुरु, 426 प्रकरणांची नोंद

Corona चा नवा व्हेरिएंट? Omicron च्या BA.2 स्ट्रेनचा कहर; व्हेरिएंटचा तपास सुरु, 426 प्रकरणांची नोंद

काही महिन्यांपूर्वी आटोक्यात आलेला कोरोना व्हायरसचा (Corona virus)  प्रार्दुभाव (Outbreaks)  पुन्हा एकदा वाढू लागला आहे. दक्षिण आफ्रिकेत (South Africa)  नव्यानं आढळून आलेला ओमायक्रॉन व्हेरिएंटनं (Omicron variant)  जगभरात धुमाकूळ घातला आहे.

काही महिन्यांपूर्वी आटोक्यात आलेला कोरोना व्हायरसचा (Corona virus) प्रार्दुभाव (Outbreaks) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. दक्षिण आफ्रिकेत (South Africa) नव्यानं आढळून आलेला ओमायक्रॉन व्हेरिएंटनं (Omicron variant) जगभरात धुमाकूळ घातला आहे.

काही महिन्यांपूर्वी आटोक्यात आलेला कोरोना व्हायरसचा (Corona virus) प्रार्दुभाव (Outbreaks) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. दक्षिण आफ्रिकेत (South Africa) नव्यानं आढळून आलेला ओमायक्रॉन व्हेरिएंटनं (Omicron variant) जगभरात धुमाकूळ घातला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Pooja Vichare

नवी दिल्ली, 22 जानेवारी: काही महिन्यांपूर्वी आटोक्यात आलेला कोरोना व्हायरसचा (Corona virus) प्रार्दुभाव (Outbreaks) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. दक्षिण आफ्रिकेत (South Africa) नव्यानं आढळून आलेला ओमायक्रॉन व्हेरिएंटनं (Omicron variant) जगभरात धुमाकूळ घातला आहे. त्यातच ओमायक्रॉन व्हेरिएंटसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे.

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार युनायटेड किंग्डममधील आरोग्य अधिकारी BA.2 चा तपास करत आहेत. ओमायक्रॉनमध्ये BA.1, BA.2 आणि BA.3 असलेले तीन उप-वंश (Sub-lineage) किंवा जाती (स्ट्रेन) आहेत.

त्यामुळे यूकेमध्ये कोविड-19 च्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या उप-वंशाचा तपास सुरु झाला आहे. यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीने BA.2 ला तपासाधीन एक व्हेरिएंट म्हणून नियुक्त केलं आहे.

BA.2 ला अद्याप चिंतेचा व्हेरिएंट म्हणून नियुक्त केलेलं नाही. या घडामोडींशी परिचित असलेल्या लोकांनी रॉयटर्सला सांगितलं की, ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या या उप-वंशामध्ये ओमायक्रॉनमध्ये दिसणारे विशिष्ट उत्परिवर्तन नाही आहे, ज्यामुळे डेल्टापासून ते सहजपणे वेगळे करणे कठीण होते.

महिलांच्या कपड्यात लपवून ठेवले होते 4 किलो ड्रग्ज, NCB नं केला पर्दाफाश

यूकेनं या नवीन व्हेरिएंटमधील कोविड-19 ची 426 प्रकरणे नोंदवली आहेत. यूके सोबतच, डेन्मार्क, भारत, यूके, स्वीडन आणि सिंगापूरमधून तपासाधीन व्हेरिएंटतील बहुतेक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. डेन्मार्कमधून सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

Omicron च्या नव्या स्ट्रेनचा कहर

गेल्या आठवड्यातील वृत्तानुसार, डेली एक्सप्रेसच्या मते, यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सी (UK Health Security Agency UKHSA) ने यूकेमध्ये ओमायक्रॉनचे 53 सिक्वेंस ओळखले आहेत. UKHSA च्या नुसार, UK मध्ये Omicron च्या BA.2 स्ट्रेनची 53 प्रकरणे नोंदवली गेली होती.

कमी गंभीर लक्षणे

हेल्थ सिक्युरिटी एजन्सीने म्हटलं होतं की, ओमायक्रॉन व्हेरिएंटची सर्वात वेगानं पसरणारी लक्षणे कमी तीव्र आहेत. UKHSA म्हणाले, आम्हाला खात्री आहे की प्रौढांमध्ये Omicron ची तीव्रता कमी आहे. UKHSA इशारा दिला आहे की, BA.2 स्ट्रेनमध्ये 53 अनुक्रम (सिक्वेंस) आहेत जे अत्यंत संसर्गजन्य आहेत. यात कोणतेही विशिष्ट उत्परिवर्तन नाही ज्यामुळे ते डेल्टा व्हेरिएंटपासून सहज ओळखले जाऊ शकते. याच्या काही दिवस आधी इस्रायलमध्ये ओमायक्रॉनचा हा स्ट्रेन सापडला होता.

डेन्मार्कमध्ये रुग्णांचा आकडा वाढला

डेन्मार्कमध्ये BA.2 मुळे नवीन रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याचे नोंदवण्यात आलं आहे. यावर्षीच्या दुसऱ्या आठवड्यात 45% प्रकरणे ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या उप-वंशामुळे नोंदली गेली. डेन्मार्कमधील संशोधकांनी असंही म्हटलं आहे की, हे शक्य आहे की ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे उद्भवलेल्या या महामारीमध्ये दोन उच्चांक असू शकतात. वर नमूद केलेल्या राष्ट्रांसह 40 राष्ट्रांनी BA.2 उप-वंशाशी संबंधित प्रकरणे नोंदवली असल्याचं UKHSA नं सांगितलं आहे.

UKHSA च्या घटना संचालक डॉ मीरा चंद यांनी वृत्तसंस्था रॉयटर्सला सांगितले की नवीन रूपे उदयास येत राहतील. व्हायरसचा उत्क्रांत होणं आणि उत्परिवर्तन होणं हा स्वभाव आहे. त्यामुळे अशी अपेक्षा केली जाते की आपण नवीन रूपे उदयास येत राहतील, असे चंद यांनी म्हटलं आहे.

IND vs SA : आफ्रिकेच्या कॅप्टनचा टीम इंडियावर निशाणा, सीरिज जिंकल्यानंतर लगावला टोला 

डेन्मार्कमधील संशोधकांनी सांगितलं की, रुग्णाच्या वाढीच्या वाढीमुळे हैराण झाले होते मात्र ते अद्याप चिंतित नाहीत. स्टेटन्स सीरम इन्स्टिट्यूट (SSI) चे संशोधक अँडर्स फॉम्सगार्ड म्हणाले की, BA.2 लोकसंख्येतील प्रतिकारशक्तीला अधिक प्रतिरोधक असू शकते.

दरम्यान WHO च्या मते, BA.1 आणि BA.3 च्या स्पाइक प्रोटीनमध्ये 69 ते 70 डिलेशन आहेत तर BA.2 मध्ये नाही. भारतीय SARS-CoV-2 Genomics Consortium (INSACOG) हे भारतातील कोरोना विषाणूच्या जीनोमिक क्रमाचा अभ्यास करण्यासाठी INSACOG आहे. (Indian SARS-CoV-2 Genomics Consortium -INSACOG) देशभरात त्याच्या 38 प्रयोगशाळा आहेत. INSACOG म्हणते की Omicron प्रकार Omicron (B.11.529) चा भाऊ BA.1 देशात वेगाने पसरत आहे आणि त्यानं महाराष्ट्रात डेल्टाची जागा घेतली आहे.

अनेक देशांमध्ये BA.2 स्ट्रेन

इस्रायली अहवालानुसार, BA.2 स्ट्रेन आतापर्यंत अनेक देशांमध्ये पोहोचला आहे. डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चीन, भारत आणि सिंगापूर येथे त्याचे प्रकार आधीच आढळले आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, ओमायक्रॉन व्हेरिएंटचे तीन स्ट्रेन किंवा सब लीनिएज आहेत - BA.1, BA.2 आणि BA.3.

First published:

Tags: Coronavirus, Omicron