मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Corona New Variant XE in Mumbai: Corona चे दोन्ही डोस घेऊनही Positive, मुंबईत XE व्हेरिएंटचं दुसरं प्रकरण

Corona New Variant XE in Mumbai: Corona चे दोन्ही डोस घेऊनही Positive, मुंबईत XE व्हेरिएंटचं दुसरं प्रकरण

कोरोना व्हायरसच्या (Corona Virus)  नवीन XE व्हेरिएंटबाबतची (New XE variant) दहशत पुन्हा एकदा वाढली आहे. या व्हेरिएंटचा दुसरा रुग्ण मुंबईत आढळून आला आहे.

कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) नवीन XE व्हेरिएंटबाबतची (New XE variant) दहशत पुन्हा एकदा वाढली आहे. या व्हेरिएंटचा दुसरा रुग्ण मुंबईत आढळून आला आहे.

कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) नवीन XE व्हेरिएंटबाबतची (New XE variant) दहशत पुन्हा एकदा वाढली आहे. या व्हेरिएंटचा दुसरा रुग्ण मुंबईत आढळून आला आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 10 एप्रिल: कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) नवीन XE व्हेरिएंटबाबतची (New XE variant) दहशत पुन्हा एकदा वाढली आहे. या व्हेरिएंटचा दुसरा रुग्ण मुंबईत आढळून आला आहे. मुंबईतील सांताक्रूझ (Santacruz) परिसरात XE व्हेरिएंटचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. असं सांगितलं जात आहे की, या व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णाने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते. याआधी ओमायक्रॉन व्हेरियंटच्या या सब व्हेरिएंटची पहिली केस मुंबईत आढळून आली होती. महाराष्ट्राव्यतिरिक्त गुजरातमध्येही हा व्हेरिएंटचा एक रुग्ण आढळून आला आहे.

11 मार्च रोजी गुजरातमधील वडोदरा येथील एका वृद्धाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्याचा नमुना जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आला. ज्यामध्ये ते XE व्हेरिएंटचे काही अंश आढळून आलं.

ही व्यक्ती मुंबईहून प्रवास करून गुजरातमधील वडोदरा येथे पोहोचली होती आणि एका खासगी हॉटेलमध्ये थांबली होती. यादरम्यान, लक्षणे दिसल्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली आणि कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ही वृद्ध व्यक्ती देखील 3 लोकांच्या संपर्कात आली होती. या सर्व लोकांची चाचणी देखील करण्यात आली होती मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

मुंबईतील एका 50 वर्षीय महिलेला या नवीन व्हेरिएंटची लागण झाली होती. या महिलेमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती ही दिलासादायक बाब होती. ती 10 फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेतून परतली. भारतीय SARS-CoV-2 Genomics Consortium (INSACOG) चे तज्ज्ञ कोरोनाचा हा नवीन व्हेरिएंट शोधण्यासाठी नमुन्याच्या जीनोमची सतत क्रमवारी करत आहेत.

दरम्यान INSACOG शी संबंधित सूत्रांनी सांगितलं की, या व्हेरिएंटला घाबरण्याची गरज नाही. सध्या या सर्व व्हेरिएंटची तीव्रता आणि रूग्णांच्या रूग्णालयात दाखल होण्याच्या दरावर लक्ष ठेवलं जात आहे.

कोरोना व्हायरस XE चे नवीन व्हेरिएंट हे Omicron च्या BA.1 आणि BA.2 या दोन सब व्हेरिएंटची उत्परिवर्तित आवृत्ती आहे. सध्या जगभरात फार कमी केसेस पाहायला मिळत आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, ते ओमायक्रॉनच्या BA.2 सब व्हेरिएंटपेक्षा सुमारे 10 टक्के वेगाने पसरते. आतापर्यंत ओमायक्रॉनची BA.2 आवृत्ती सर्वात वेगाने पसरणारा स्ट्रेन मानली जात होती.

First published:

Tags: Corona updates, Corona virus in india, Coronavirus cases