मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

'चीन नव्हे तर या देशातून आला कोरोना'; व्हायरसच्या स्रोताबाबत नवा खळबळजनक दावा

'चीन नव्हे तर या देशातून आला कोरोना'; व्हायरसच्या स्रोताबाबत नवा खळबळजनक दावा

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - रॉयटर्स)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - रॉयटर्स)

चीनच्या वुहान लॅबमधून नव्हे तर या देशाच्या लॅबमधून कोरोना लीक झाल्याचा दावा एका तज्ज्ञाने केला आहे.

  • Published by:  Priya Lad

वॉशिंग्टन, 06 जुलै :  कोरोना महासाथीला दोन वर्षे उलटली तरी त्याच्या उगमाबाबत अद्याप समजलं नाही आहे (Coronavirus origin). सुरुवातीला वटवाघळामार्फत हा व्हायरस पसरल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला, त्यानंतर चीनच्या वुहान लॅबमधून तो पसरल्याचा आरोप करण्यात आला (Coronavirus Leak from china wuhan lab). अद्यापही कोरोनासाठी चीनलाच जबाबदार धरलं जात आहे. अशात आता कोरोनाच्या स्रोताबाबत नवा दावा केला जातो आहे. ज्यात कोरोना चीन नव्हे तर दुसऱ्याच देशातून पसरल्याचं सांगितलं जातं आहे. या दाव्याने खळबळ उडाली आहे. कारण हा देश दुसरा तिसरा कोणता नाही तर अमेरिकाच आहे (Coronavirus Leak from Us lab).

कोरोनासाठी अमेरिका वारंवार चीनवर आरोप करत आहे. त्याच अमेरिकेतील तज्ज्ञांनी कोरोनाच्या स्रोताबाबत नवा खळबळजनक दावा केला आहे. अमेरिकेतील अर्थशास्त्रज्ज्ञ जेफरी सैस यांच्या मते, हा व्हायरस चीनच्या वुहान लॅबमधून नव्हे तर अमेरिकेच्या लॅबमधूनच पसरला आहे. सैस यांनी याआधीही कोरोना महासाथ चीन आणि अमेरिकेच्या शास्त्रज्ञांमध्ये झालेल्या प्रयोगाचा परिणाम असल्याचं सांगितलं होतं.

हे वाचा - Corona Precaution Dose साठी आता 9 महिने प्रतीक्षेची गरज नाही; मोदी सरकारने केला महत्त्वाचा बदल

डेली मेलच्या रिपोर्टनुसार जेफरी यांनी एका कार्यक्रमात सांगितलं की दोन वर्षे लॅन्सेटससाठी एका आयोगाच्या अध्यक्षतपदी मी काम केलं आणि हा खतरनाक व्हायरस यूएस लॅब बायोटेक्नॉलॉजीतून लीक झाल्याचा मला पूर्ण विश्वास आहे.  कोरोना हा नैसर्गिक आहे असं म्हणणं चुकीचं आहे.  कोरोना अमेरिकेच्या लॅबमधून पसरल्याचे पुरेसे पुरावेही आपल्याकडे आहेत, असं सांगत त्यांनी याचा तपास करावा अशी मागणीही केली आहे.

जेफरी यांच्या दाव्याचं समर्थन चीननेही केलं आहे. चीनच्या सरकारी अधिकाऱ्यांनी जेफरी यांच्या दाव्याचा सखोल तपास करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

हे वाचा - डेंग्यू-चिकुनगुनियाचा नायनाट होणार! प्रयोगशाळेत निर्मित मादी डास नरांना भुलवणार! अशी आहे योजना

गेल्या महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रॉस एडनॉम घेब्रियेस यांनीही कोरोनाच्या लॅब लीक थिएरीचा तपास करण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं. पण त्यांनी कोरोना चीनच्या लॅबमधून लीक झाल्याचा उल्लेख केला होता.

First published:

Tags: Coronavirus, Lifestyle