Home /News /coronavirus-latest-news /

Omicron च्या संकटात मोठा दिलासा; कोणताही Corona variant असो त्यावर ही Vaccine प्रभावी ठरणार

Omicron च्या संकटात मोठा दिलासा; कोणताही Corona variant असो त्यावर ही Vaccine प्रभावी ठरणार

संशोधकांनी एक असा घटक शोधून काढला आहे, जो कोरोनावरच्या लशीमध्ये असेल तर कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटवर लस प्रभावी ठरेल.

मुंबई, 17 डिसेंबर : गेल्या काही महिन्यांत कोरोनाचा (Corona) संसर्ग ओसरत असल्याचं चिन्ह दिसत होतं; मात्र आता कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्याचं दिसून येत आहे. कोरोनाची परिस्थिती हळूहळू भयानक होत असून, कोरोनाचे नवनवे व्हॅरिएंट्स येत आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सध्या ओमिक्रॉन व्हॅरिएंटमुळे ( Omicron Variant) तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जात आहे. कोरोनाप्रतिबंधक लसीकरण वेगाने केलं जात आहे; मात्र कोरोना प्रतिबंधक लशी नव्या व्हॅरिएंटवर किती प्रभावी आहेत, असा प्रश्न निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकेतल्या लॉस एंजलिसमधल्या (UCLA) युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामधल्या संशोधकांनी दुर्मीळ अशा नैसर्गिक टी सेल्सचा शोध लावला आहे. या पेशी SARSCOV-2 आणि कोरोनाच्या इतर व्हॅरिएंट्सचं प्रोटीन ओळखू शकतात. या प्रोटीनमधला व्हायरल पॉलिमरेझ नावाचा घटक कोरोनावरच्या लसीमध्ये (Covid-19 Vaccine) घातल्यास मानवी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते आणि कोरोनाच्या नव्या व्हॅरिएंटपासून बचाव होऊ शकतो. कोरोना विषाणूच्या पृष्ठभागावर आढळणाऱ्या स्पाइक प्रोटीनमधला एक भाग कोरोना प्रतिबंधक लशीमध्ये वापरण्यात येतो. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. कोरोना विषाणूचं रूप बदलल्यानंतर डेल्टा आणि ओमिक्रॉनसारख्या नव्या व्हॅरिएंटमध्ये स्पाइक प्रोटीनमध्येच उत्परिवर्तन अर्थात म्युटेशन होतं. त्यामुळे लशीमुळे शरीरात निर्माण झालेल्या अँटीबॉडी (Antibodies) नव्या व्हॅरिएंटला ओळखण्यात अपयशी ठरतात. हे वाचा - कोरोनाचा जास्त त्रास झालेल्या लोकांमध्ये हे मानसिक आजार बळावण्याची भीती - संशोधन आता उत्पादित होत असलेल्या नव्या लशी (Covid Vaccine) अधिक परिणामकारक असण्याची गरज आहे, जेणेकरून त्या प्रत्येक व्हॅरिएंटवर प्रभावी ठरू शकतील. यासाठी वेगवेगळ्या विषाणूंच्या प्रोटीनचा काही भाग लशींमध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो. या खास भागात स्पाइक प्रोटीनच्या तुलनेत म्युटेशन होण्याची शक्यता कमी असायला हवी आणि रोगप्रतिकारक प्रणालीमध्ये टी पेशींनाही (T Cells) सक्रिय करता यायला हवं. टी पेशीच्या (T Cells) पृष्ठभागावर मोलेक्युलर रिसेप्टर्स (molecular receptors) असतात. मोलेक्युलर रिसेप्टर्स बाहेरच्या प्रथिनांचे तुकडे ओळखण्यास सक्षम असतात. या तुकड्यांना किंवा भागांना अँटीजेन (Antigen) असं म्हटलं जातं. अँटीजेन मिळाल्यानंतर रेणू प्राप्तकर्ता स्वतःचं प्रतिरूप बनवू शकतो आणि अतिरिक्त प्रतिरोधक पेशी तयार करतो. त्या संसर्गग्रस्त पेशींना ताबडतोब मारतात. तसंच भविष्यात शरीराचं इतर विषाणूपासून संरक्षण करतात. हे वाचा - घरात या गोष्टींचा करा धूर, Corona विषाणूही राहील दूर; आयुष मंत्रालयाची माहिती SARSCov-2, SARS, MERS, सर्दी आणि इतर विषाणूमध्ये आढळणाऱ्या व्हायरल पॉलिमरेझ प्रोटीनवर (viral polymerase protein) संशोधकांनी लक्ष केंद्रित केलं आहे. व्हायरल पॉलिमरेझ एका इंजिनाप्रमाणे काम करतं, ज्याचा वापर कोरोना विषाणू स्वतःच्या प्रती बनवण्यासाठी करतो. यामुळे संसर्ग पसरतो. विषाणूच्या नव्या व्हॅरिएंटमध्ये स्पाइक प्रोटीनप्रमाणे (Spike protein) पॉलिमरेझमध्ये बदल किंवा म्युटेशन पाहायला मिळत नाही. संशोधकांनी व्हायरल पॉलिमरेझ (viral polymerase protein) ओळखणाऱ्या रिसेप्टर्स टी पेशी बनवण्याची क्षमता विकसित केली आहे. यामध्ये आणखी प्रगती करण्याचा प्रयत्न संशोधक करत आहेत. व्हायरल पॉलिमरेझला नव्या कोरोना लशीमध्ये एका घटकाच्या रूपात उपयोगात आणता येईल. हे संशोधन सेल रिपोर्ट्स जर्नलमध्ये प्रकाशित झालं आहे.
First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus

पुढील बातम्या