मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

2021 आधी कोरोनाचं वॅक्सीन अशक्य? काय आहे जागतिक आरोग्य संघटनेचा दावा

2021 आधी कोरोनाचं वॅक्सीन अशक्य? काय आहे जागतिक आरोग्य संघटनेचा दावा

तर या 35 लशींमध्ये 5 प्रयोगांवर जगभरातल्या तज्ज्ञांची आशा एकवटली आहे.

तर या 35 लशींमध्ये 5 प्रयोगांवर जगभरातल्या तज्ज्ञांची आशा एकवटली आहे.

कोरोनाचं वॅक्सीन उपलब्ध झालं तरी मोठ्या प्रमाणात ते तयार करणं आणि पोहोचवण्यासाठी वेळ लागू शकतो असंही WHOनं म्हटलं आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar
वॉशिंग्टन, 23 जुलै: एकीकडी ऑक्सफोर्डचा कोरोनावरील मानवी चाचणीचा दुसरा टप्पा यशस्वीपणे पार पडल्यानंतर आता अंतिम टप्प्यातील निरीक्षण सुरू आहे. याच दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेनं मोठा दावा केला आहे. 2021 आधी कोरोनाचं वॅक्सीन येण्याची शक्यता अगदी कमी असल्याचं म्हटलं आहे 2021 च्या सुरुवातीच्या टप्प्यात वॅक्सीन येईल असा दावा जागतिक आरोग्य संघटनेनं केला आहे. जगभरात रशिया, अमेरिका आणि ब्रिटनमधील काही संस्थाही कोरोनाच्या वॅक्सीनवर वेगवेगळ्या टप्प्यात काम करत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनावर वॅक्सीन तयार करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असताना ऑक्सफोर्डनं तयार केलेल्या लसीला यश मिळालं असून ती अंतिम टप्प्यात आहे. 2021 ला कोरोनाचं वॅक्सीन उपलब्ध झालं तरी मोठ्या प्रमाणात ते तयार करणं आणि पोहोचवण्यासाठी वेळ लागू शकतो असंही WHOनं म्हटलं आहे. हे वाचा-पुणं झालं Corona Hotspot : देशात सर्वाधिक नवे रुग्ण असलेल्या जिल्ह्यातलं चित्र WHOचे कार्यकारी संचालक माइक रायन यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचं वॅक्सीन संशोधकांना चांगलं यश मिळवून देत आहे. पण 2021 आधी ही वॅक्सीन उपलब्ध होऊ शकत नाही. 2021 च्या सुरुवातीच्या टप्प्यात हे वॅक्सीन तयार झालं तरीही ते सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात वेळ लागू शकतो. वॅक्सीन तयार होण्याचा वेग थोडा कमी झाला असला तरीही त्याच्या सुरक्षा मानकामध्ये कोणतीही तडजोड होऊ नये याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. बऱ्याच वॅक्सीनचं काम अंतिम टप्प्यात आहे. या वॅक्सीनची सुरक्षितता आणि परिणाम यामध्ये अद्याप असफल झाले नाहीत. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची निरीक्षणं काय येतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. हे वाचा-पंतप्रधान मोदींचा व्यावसायिकांना इशारा; भारतातील गुंतवणुकीबाबत केलं मोठं वक्तव्य कोरोनावर जगभरात वॅक्सीन तयार करण्याचं काम सुरू आहे. अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि ऑक्सफोर्ड तयार केलेल्या लशीची मानवी चाचणी यशस्वीरित्या पार पडली. ही लसीच्या संशोधनात पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचाही मोलाचा वाटा आहे. या लसीच्या उत्पादनात ही कंपनी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. सध्या या लसीचं काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ती उपलब्ध होईल अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एसआयआय) कंपनीकडून देण्यात आली आहे.
First published:

Tags: Coronavirus, Coronavirus symptoms

पुढील बातम्या