मोठी बातमी! खासगी रुग्णालयातही Corona Vaccine; अवघ्या 250 रुपयांत मिळणार एक डोस!

मोठी बातमी! खासगी रुग्णालयातही Corona Vaccine; अवघ्या 250 रुपयांत मिळणार एक डोस!

राज्यात पुन्हा कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे नागरिक लशीच्या प्रतीक्षेत आहेत.

  • Share this:

पुणे, 27 फेब्रुवारी : कोविड-19 (Covid-19) विरोधात लढण्यासाठी लशींच्या (Coronavirus Vaccine) किंमतींबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्यात पुन्हा कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे नागरिक लशीच्या प्रतीक्षेत आहेत. अशातच लशीबाबत व त्याच्या किमतींबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार खासगी रुग्णालयांमध्ये एका डोससाठी 250 रुपये आकारले जाऊ शकतात. राज्याचे आरोग्य सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांसाठी लसीकरणाच्या मोहिमेबद्दल खासगी रुग्णालयांना सूचित करण्यात आलं आहे.

द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना डॉक्टर व्यास यांनी सांगितलं की, खासगी रुग्णालयात एका व्यक्तीमागे 250 रुपये आकारले जाऊ शकतात. ते पुढे म्हणाले की, नॅशनल हेल्थ ऑथॉरिटीचे कार्यकारी अधिकारी आणि केंद्रीय आरोग्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली कोविड 2.0 बाबत झालेल्या प्रशिक्षण आणि वर्च्युअल मिटिंगमध्ये सर्विस चार्जसंदर्भात माहिती देण्यात आली होती. डॉ. व्यास पुढे म्हणाले की, कोविड सेंटर्स म्हणून काम करणाऱ्या खासगी रुग्णालयांकडून आकारण्यात येणारा सर्विज चार्ज प्रत्येक व्यक्ती व एका डोसमागे 100 रुपयांपर्यंत असेल. यासोबतच रुग्णालये लशींच्या किंमतींबरोबरच प्रति व्यक्ती डोस 150 रुपये वसूल करतील. अशातच खासगी रुग्णालयांना प्रत्येक व्यक्तीमागे डोस 250 रुपयांपर्यंत पडू शकेल.

हे ही वाचा-कोरोना रुग्णांचा भररस्त्यात गोंधळ; औरंगाबादच्या Covid सेंटरसमोरील VIDEO

अतिरिक्त सचिव आणि राष्ट्रीय आरोग्य मिशन निर्देशक वंदना गुरनानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही व्यवस्था पुढील आदेश येईपर्यंत लागू असेल. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना यादीत असलेल्या रुग्णालयांना लशींच्या किंमतींबाबत आणि कोविड लसीकरण मोहिमेबाबत माहिती देण्यास सांगण्यात आलं आहे. भारतात गेल्या 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू झालं आहे. देशात सध्या 2 लस आहेत, यात कोविशील्ड आणि कोवॅक्सिन यांचा समावेश आहे.

दुसरा टप्पा लवकरच सुरू

1 मार्चपासून देशात लसीकरण कार्यक्रमाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांनंतर आता दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठांना लस दिली जाणार आहे. विशेष म्हणजे या टप्प्यात ज्येष्ठांव्यतिरिक्त 45-60 या वयोगटातील नागरिकांचा समावेश होईल. शनिवारी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरातमध्ये कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसत आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: February 27, 2021, 6:04 PM IST

ताज्या बातम्या