चांगली बातमी! 6 कोटी लोकांना लवकरच मिळणार डोस, पुण्याच्या सीरमनं तयार केली लस

चांगली बातमी! 6 कोटी लोकांना लवकरच मिळणार डोस, पुण्याच्या सीरमनं तयार केली लस

लवकरच बाजारात कोरोनाची लस उपलब्ध होईल, यासाठी सर्व फार्मा कंपन्या जोरदार तयारी करत आहेत. यातच देशात कोरोनाला रोखण्यासाठी आतापर्यंत 6 कोटी लशीचे डोस तयार केले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर : कोरोनाबाधितांची संख्या जगभरात कमी झाल्यानंतर आता सर्वांना प्रतिक्षा आहे ती कोरोना लशीची (Corona Vaccine). लवकरच बाजारात कोरोनाची लस उपलब्ध होईल, यासाठी सर्व फार्मा कंपन्या जोरदार तयारी करत आहेत. यातच देशात कोरोनाला रोखण्यासाठी आतापर्यंत 6 कोटी लशीचे डोस तयार केले आहे.

कोरोना तयार करणारी भारतातील कंपनी सीरम इंस्टिट्युट आणि भारत बायोटेक यांनी लशीची तयारी सुरु केली आहे. सीरम संस्थेने आतापर्यंत 6 कोटी डोस तयार केले आहेत, तर भारत बायोटेकनेही उत्पादन सुरू केले आहे. कोरोना लस भारतात तयार होण्याबरोबरच रशियाची स्पुतनिक -5 ही लसही भारतात दाखल झाली असून लवकरच त्याचे उत्पादन सुरू केले जाऊ शकते.

वाचा-कोरोनाशी 2024 पर्यंत करावा लागेल सामना, लस येईल पण ती मिळणार का आपल्याला?

फार्मा कंपनी ज्या वेगानं कोरोना लस तयार करत आहेत, ते पाहता लवकरच कोरोनावर मात करू शकणारी लस उपलब्ध होऊ शकते. येत्या काही महिन्यांत अनेक कोरोना लस बाजारात उपलब्ध होऊ शकतात. सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, देशातील पहिल्या 30 कोटी लोकांना सर्वात आधी कोरोना लस देण्यात येणार आहे.

वाचा-2021 मध्ये परिस्थिती बिघडणार; कोरोनाबरोबरच या महासाथीसाठी दिला इशारा

जगभरात 155 लशींवर काम सुरू

जगभरात आतापर्यंत 155 कोरोना लशीवर काम सुरू आहे. यातील 47 लस या अंतिम टप्प्यात आहेत. जगभरातील फार्मा कंपनीमध्ये भारतात सध्या भारत बायोटेक, फायजर, ऑक्सफर्ड आणि स्पूतनिक-5 सारख्या लसींचा समावेश आहे. फायजर ही लस आता 90 टक्के प्रभावी असल्याचे सांगितले जात आहे.

वाचा-अडीज लाख नागरिकांच्या मृत्यूनंतर US मध्ये कोरोनाचा कहर अधिक वाढला

कोरोनाशी 2024 पर्यंत करावा लागेल सामना

भारताला प्रत्येक नागरीकाला एक डोज द्यायचा द्यायचा असेल तर किमान 130 कोटींपेक्षा जास्त डोज लागणार आहेत. त्यामुळे त्याचा खर्च आणि उत्पादन हे मोठं आव्हान असणार आहे. हे डोस एकदाच दिले तर पुरेसे आहेत की दोन वेळा द्यावे लागतील हे अजुन स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे किमान 2024 पर्यंत कोरोनाशी लढावं लागणार असून तेवढा वेळ लसिकरणासाठी लागणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: November 16, 2020, 8:50 AM IST

ताज्या बातम्या