कोरोना लशीबाबत महत्त्वाची माहिती लपवत आहेत कंपन्या, तज्ज्ञांनी केलं अलर्ट

कोरोना लशीबाबत महत्त्वाची माहिती लपवत आहेत कंपन्या, तज्ज्ञांनी केलं अलर्ट

लस उत्पादन करणाऱ्या कंपनी लशीबाबत काही माहिती लपवत तर नाही आहे ना? असे प्रश्न उपस्थित होत आहे.

  • Share this:

लंडन, 15 सप्टेंबर : जगभरातील कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या दिवसेंदिवस वाढत असताना कोरोना लशीबाबतच्या (Coronavirus vaccine)अपडेटकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासगळ्यात लस उत्पादन करणाऱ्या कंपनी लशीबाबत काही माहिती लपवत तर नाही आहे ना? असे प्रश्न उपस्थित होत आहे. जगभरातील अनेक वैज्ञानिक आणि सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की या कंपन्या चाचणीत पूर्ण पारदर्शकता ठेवत नाहीत. विशेषतः जेव्हा सुरक्षेच्या कारणास्तव लशीची चाचणी थांबते तेव्हा कंपन्यांनी त्यांना हा निर्णय का घ्यावा लागला? हे सांगण्यास नकार दिला आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे अ‍ॅस्ट्रॅजेनेका (AstraZeneca) ही लस.

ऑक्सफर्ड विद्यापीठाची या लशीची चाचणी थांबवण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी पुन्हा ट्रायलची परवानगी देण्यात आली. मात्र कंपनीने रुग्णांच्या स्थितीबद्दल किंवा लशीचे ट्रायल थांबवण्यामागचे कारण सांगितले नाही. तसेच पॅनेलचा रिपोर्टही समोर आला नाही. कंपनी हजारो व्हॉलेटिअरर्सवर लशीची क्लिनिकल चाचणी करणार आहे, मात्र या लशीबाबत फारच थोडी माहिती उपलब्ध आहे.

वाचा-सरकारच्या एका निर्णयामुळे 38 हजार लोकांचा वाचला जीव, आरोग्य मंत्र्यांचाा दावा

संशोधनाबाबत कंपन्या लपवत आहेत माहिती?

गेल्या आठवड्यात अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि फायझर यांच्यासह नऊ फार्मा कंपन्यांनी लशीची चाचणी झाल्याशिवाय लस लॉंच करण्यास नकार दिला. मात्र तज्ज्ञांच्या मते, कंपन्यांनी केलेले विधान हे संशोधनाविषयी महत्त्वपूर्ण माहिती देण्याचे आश्वासन देत नाही. अमेरिकेतील तीन कंपन्या- अ‍ॅस्ट्रॅजेनेका, मदेरना आणि फायझर - अखेरच्या टप्प्यात आहेत. या तिघांनी चाचण्यांचे प्रोटोकॉल आणि विश्लेषण प्लॅन पुढे आणल्या आहेत.

वाचा-प्रत्येकापर्यंत लस पोहोचायला उजाडेल 2024 साल; Serum च्या प्रमुखांनी केलं स्पष्ट

2021 पर्यंत मिळणार लस

या वर्षाच्या अखेरीस अमेरिकेत ही लस सुरू करण्यात येणार असल्याचे फायझरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बुर्ला यांनी सांगितले. ते म्हणाले की त्यांची कंपनी त्या परिस्थितीसाठी तयार आहे. ते म्हणाले की फायझर आणि बायोनोटॅकची लस 'सुरक्षित' आहे आणि 2021 च्या आधी अमेरिकेतील लोकांना ही लस देण्यात येईल.

वाचा-अधिवेशनापूर्वी कोरोना चाचणी; 30 टक्के खासदार पॉझिटिव्ह, यात शिवसेनेचे 4 सदस्य

जपानमध्ये लसीची चाचणी सुरू झाली

अ‍ॅस्ट्रॅजेनेका यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठात एक लस तयार केली आहे. मंजुरीनंतर कंपनीने पुन्हा यूकेमध्ये चाचण्या सुरू केल्या. आता जपानमध्येही मानवी चाचणीस सुरुवात झाली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाची परवानगी मिळाल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देखील देशातील या लसीची पुन्हा चाचणी सुरू करेल.

Published by: Priyanka Gawde
First published: September 15, 2020, 8:43 AM IST

ताज्या बातम्या