Coronavirus Vaccine: ट्रायलशिवायच भारतात दिली जाणार वादग्रस्त परदेशी लस, मोदी सरकारनं दिली परवानगी

Coronavirus Vaccine: ट्रायलशिवायच भारतात दिली जाणार वादग्रस्त परदेशी लस, मोदी सरकारनं दिली परवानगी

एकीकडे मेड इन इंडिया लस तिसऱ्या ट्रायलमध्ये असताना भारतात कोरोनाव्हायरसची आणखी एक लस चाचणी सुरू होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : देशातील कोरोना रुग्णांची संख्या आता कमी झाली आहे, मात्र कोरोनाची लस कधी येणार? असा प्रश्न अजूनही सर्व भारतीयांच्या मनात आहे. एकीकडे मेड इन इंडिया लस तिसऱ्या ट्रायलमध्ये असताना भारतात कोरोनाव्हायरसची आणखी एक लस चाचणी सुरू होणार आहे. या महिन्यात, DCGIने रशियाच्या स्पुतनिक V लसच्या (Sputnik V) चाचणीसाठी परवानगी दिली. भारतातील 100 व्हॉलेंटिअरना लस दिली जाणार आहे.

Sputnik यांनी सांगितले की, तिसऱ्या टप्प्यात पोहचण्यापूर्वी लसीच्या उर्वरित दोन टप्प्यांचा ट्रायलही करण्यात येणार आहे. असे सांगितले गेले होते की 1400 लोक तिसऱ्या टप्प्यात सामिल होऊ शकतात. याआधी फार्मा कंपनी दुसऱ्या टप्प्याची सुरक्षा आणि इम्युनोजेनेसिटी डेटा देईल. त्यानंतरच तिसर्‍या टप्प्यातील चाचणी सुरू होईल.

वाचा-भारत बायोटेक कोरोना लशीची लवकरच सुरू होणार तिसऱ्या टप्प्यातील चाचणी

यापूर्वी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेडला कोव्हिड-19 लस स्पुतनिक व्हीची दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यातील मानवी चाचण्या आयोजित करण्यास मान्यता देण्यात आली. कंपनीने म्हटले आहे की या लशीला आणि रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडला (RDIF) भारतीय नियंत्रक जनरलकडून (डीजीसीआय) ही मंजुरी मिळाली होती. कंपनीने म्हटले होते की हा एक नियंत्रित अभ्यास असेल, जो अनेक केंद्रांवर केला जाईल.

वाचा-तुम्ही मास्क घालत नाही? मग कोरोनासोबत 'या' आजारालाही आमंत्रण देत आहात !

डॉ. रेड्डीज आणि RDIF ची भागीदारी

डॉ रेड्डीज आणि RDIF सप्टेंबर 2020 मध्ये भारतात लशीचे वितरण करण्यासाठी भागीदारी केली होती. या भागीदारी अंतर्गत, आरडीआयएफ नियामक मान्यतेवर डॉ. रेड्डी यांच्या लशीचे 10 कोटी डोस पुरवेल. कंपनीचे सह-अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जी.व्ही. प्रसाद म्हणाले की, ही एक महत्त्वाची बातमी आहे, ज्यामुळे आम्हाला क्लिनिकल चाचण्या भारतात सुरू करता येतील. साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी आम्ही एक सुरक्षित आणि प्रभावी लस आणण्यासाठी वचनबद्ध आहोत.

वाचा-फक्त मास्क आणि सॅनिटायझर नाही कोरोनापासून बचावासाठी दातही घासा!

भारत बायोटेक लस तिसऱ्या टप्प्यात

भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोरोनाच्या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला परवानगी देण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी भारत बायोटेकला मान्यता मिळाली आहे. या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी ही देशभरातील 18 ते 19 वेगवेगळ्या ठिकाणी केली जाणार आहे अशी माहिती उच्च स्तरीय सूत्रांकडून मिळाली आहे. या चाचणीसाठी साधारण 22,000 स्वयंसेवक सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: October 23, 2020, 8:55 AM IST

ताज्या बातम्या