मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Pfizer नंतर कोव्हिशील्ड लस आपत्कालीनं वापरासाठी सीरमने मागितली परवानगी

Pfizer नंतर कोव्हिशील्ड लस आपत्कालीनं वापरासाठी सीरमने मागितली परवानगी

Pfizer कंपनीने भारतात आपत्कालीन कोरोना लशीचा डोस परवानगी मागितल्यानंतर आता सीरम संस्थेनं देखील अर्ज केल्याची माहिती मिळाली आहे. असा अर्ज करणारी स्वदेशी पहिली लस आहे.

Pfizer कंपनीने भारतात आपत्कालीन कोरोना लशीचा डोस परवानगी मागितल्यानंतर आता सीरम संस्थेनं देखील अर्ज केल्याची माहिती मिळाली आहे. असा अर्ज करणारी स्वदेशी पहिली लस आहे.

Pfizer कंपनीने भारतात आपत्कालीन कोरोना लशीचा डोस परवानगी मागितल्यानंतर आता सीरम संस्थेनं देखील अर्ज केल्याची माहिती मिळाली आहे. असा अर्ज करणारी स्वदेशी पहिली लस आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar
पुणे, 07 डिसेंबर : कोरोनाची लस डिसेंबरच्या अखेरपर्यंत मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात असतानाच स्वदेशी लशीसंदर्भात मोठी अपडेट येत आहे. Pfizer कंपनीने भारतात आपत्कालीन कोरोना लशीचा डोस परवानगी मागितल्यानंतर आता सीरम संस्थेनं देखील अर्ज केल्याची माहिती मिळाली आहे. असा अर्ज करणारी स्वदेशी पहिली लस आहे. सीरम संस्थेला परवानगी मिळाली तर भारतातील पहिली स्वदेशी लस ठरू शकेल. सीरम संस्थेनं तयार केलेली कोव्हिशिल्ड या लशीची सध्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी सुरू आहे. ही लस पहिली किंवा दुसऱ्या तिमाहीपर्यंत बाजारात उपलब्ध होऊ शकते असा विश्वास आदर पुनवाला यांनी व्यक्त केला होता. Pfizer नंतर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने देखील आपल्या 'कोविशिल्ड लशीच्या  आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मागितली आहे. या हालचालींमुळे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही भारतीय औषधी नियंत्रक (डीजीसीआय) वर अर्ज करणारी पहिली स्वदेशी कंपनी आहे. मिळालेल्या माहितीनुसार सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने डीजीसीआयला वैद्यकीय गरजा व लोकहिताचे व्यापक प्रमाण सांगून साथीच्या काळात 'कोविशिल्ड' लस मंजूर करण्याची विनंती केली आहे. शनिवारी अमेरिकन औषध निर्माता फायझर या भारतीय युनिटने देखील कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी औपचारिक मंजुरीसाठी अर्ज केला होता. हे वाचा-Corona Vaccine घेऊनही मंत्री कोरोना पॉझिटिव्ह; AIIMS चे माजी संचालक म्हणाले... क्लिनिकल ट्रायल्सच्या चार डेटावरून असे दिसून आले आहे की कोव्हिशल्ड लस खूप प्रभावित ICMRने दिलेल्या माहितीनुसार चारपैकी दोन चाचणीचा डेटा यूकेचा तर एक ब्राझिल आणि भारतातला आहे. फायझरच्या लशीला भारतात परवानगी मिळणे अवघड, या अटीमुळे अडलं घोडं फायझरला ब्रिटनमध्ये परवानगी मिळाली आहे. तर बहरिननेही परवानगी दिली आहे. तर अमेरिकेतही कंपनीनी आणीबाणीच्या परिस्थितीत लशीच्या वापराला परवानगी मिळावी असा अर्ज केला आहे. भारतात अर्ज करताना कंपनीनी एक अट घातली आहे. या औषधामुळे जर एखाद्या रुग्णावर गंभीर दुष्परिणाम झाल्यास त्याची जबाबदारी कंपनी घेणार नाही. ती जबाबदारी सरकारे घ्यावी असं कंपनीने म्हटलं आहे. हे वाचा-पुणेकर ठरला Asian Of the Year; कोरोना विरोधी कामगिरीबद्दल पुनावालांचा सन्मान या अटीमुळे फायझरला भारतात परवानगी मिळाण्याची शक्यता नसल्याचं मत व्यक्त होत आहे. औषध नियामकांकडे दाखल केलेल्या अर्जात कंपनीने भारतात आयात आणि आपत्कालीन स्थितीत वापरण्याची परवानगी मागितली आहे. याशिवाय ड्रग्स अॅण्ड क्लिनिकल ट्रायल नियम 2019 च्या विशेष तरतुदीनुसार भारतातील लोकसंख्येचा विचार करता क्लिनिकल चाचण्यांमधून सूट मिळावी अशी विनंती करण्यात आली आहे. 4 डिसेंबर रोजी हा अर्ज करण्यात आला होता.
First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus

पुढील बातम्या