मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Covidshield वर आरोप लावणाऱ्या 40 वर्षीय स्वयंसेवकावर सीरमकडून 100 कोटींचा मानहानीचा दावा

Covidshield वर आरोप लावणाऱ्या 40 वर्षीय स्वयंसेवकावर सीरमकडून 100 कोटींचा मानहानीचा दावा

चेन्नईमध्ये झालेल्या कोविडशील्ड ('Covidshield' vaccine) लशीच्या चाचणीदरम्यान 40 वर्षीय व्यक्तीला झालेल्या त्रासाचा आणि कंपनीचा काहीही संबंध नाही. सीरम संस्थेने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

  • Published by:  Kranti Kanetkar

पुणे, 30 नोव्हेंबर: सीरम संस्थेची कोव्हिशिल्ड लशीच्या चाचणीत सहभागी झालेल्या 40 वर्षीय स्वयंसेवकानं या लशीमुळे दुष्परिणाम झाल्याचा दावा करत सीरम कंपनीवर गंभीर आरोप केले. हर्च्युअल न्यूरोलॉजिकल ब्रेकडाउन (neurological breakdown ) सारख्या समस्यांचा समावेश आहे. यासाठी व्यक्तीने 5 कोटी रुपये नुकसान भरपाई कंपनीने द्यावी अशी मागणी देखील केली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर आता सीरम संस्थेकडून या संदर्भात एक नोटीस जारी करण्यात आली आहे.

चेन्नईमध्ये झालेल्या कोविडशील्ड ('Covidshield' vaccine) लशीच्या चाचणीदरम्यान 40 वर्षीय व्यक्तीला झालेल्या त्रासाचा आणि कंपनीचा काहीही संबंध नाही. सीरम संस्थेने हे आरोप फेटाळून लावले आहेत. सीरमने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'रुग्णाला आमची सहानुभूती आहे. कोव्हिशिल्ड लशीची चाचणी आणि त्याची सध्या बिघडलेली प्रकृती याचा काहीही संबंध नाही. त्याच्या या प्रकृतीला विनाकारण तो सीरम संस्थेला दोषी धरत असून असे चुकीचे आणि गंभीर आरोप करणाऱ्या या व्यक्तीवर कंपनीकडून 100 कोटींचा मानहानीचा दावा कऱण्यात आला आहे.

हे वाचा-बड्या नेत्यांनी कोरोनाविरोधात युद्ध जिंकलं; POST COVID COMPLICATION ने घेतला जीव

नेमकं काय घडलं? काय आहे प्रकरण?

चेन्नईमध्ये झालेल्या कोविडशील्ड लशीच्या मानवी चाचणीत एका 40 वर्षीय व्यक्तीनं सहभाग घेतला होता. लशीचे डोस घेतल्यानंतर 11 ऑक्टोबर रोजी त्यानं झालेले दुष्परिणाम नोंदवले आणि त्यामध्ये या व्यक्तीनं गंभीर आरोप केले असून लशीची चाचणी तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. 40 वर्षीय व्यक्तीनं केलेल्या दाव्यानुसार त्याला या लशीचा डोस घेतल्यानंतर व्हर्च्युअल न्यूरोलॉजिकल ब्रेकडाउन (neurological breakdown ) सारख्या समस्यांचा जाणवल्या. याची भरपाई नुकसान भरपाई म्हणून सीरम संस्थेनं 5 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी करत एका कायदेशीर नोटीशीत नुकसान ट्रायल रोखण्याची मागणी केली होती.

याबाबत आता सीरम संस्थेनं नोटीस जारी केली असून 40 वर्षीय व्यक्तीवर मानहानीचा दावा केल्याचंही सांगण्यात आलं आहे. कोव्हिशिल्ड ही लस ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि फार्मा कंपनी अ‍ॅस्ट्रॅजेनेका यांनी तयार केली आहे.

First published:

Tags: Corona vaccine