Home /News /coronavirus-latest-news /

कोरोनाच्या लशीसंदर्भात सर्वात मोठी अपडेट, अमेरिकेत 11 डिसेंबरपर्यंत मिळणार लस

कोरोनाच्या लशीसंदर्भात सर्वात मोठी अपडेट, अमेरिकेत 11 डिसेंबरपर्यंत मिळणार लस

मॉडर्ना नावाच्या कंपनीनं ही लस तयार केली असून 94.5 टक्के ही लस चाचणीमध्ये यशस्वी झाल्याचा दावा कंपनीकडून केला जात आहे.

    नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर: कोरोनाचं जगभरात पुन्हा धुमशान सुरू झालं आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा लॉकडाऊन देखील करण्यात येत आहे. कोरोनावर लस कधी येणार हा संपूर्ण जगासमोर असलेला मोठा प्रश्न आहे. त्यातच आता एक दिलासा आणि आनंद देणारी बातमी आली आहे. 11 डिसेंबरपर्यंत कोरोनाची पहिली लस उपलब्ध होईल असं सांगितलं जात आहे. अमेरिकेतील कोरोना लशीच्या मोहिमेतील प्रमुख मोन्सेफ सलोई यांना या संदर्भात माहिती दिली आहे. कोरोनाची लस तयार करणाऱ्या अमेरिकेतील फायझन या कंपनीने US अन्न आणि औषध विभागाकडे (US Food and Drug Administration) यासंदर्भात परवानगी मागितली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर आम्ही 24 तासांच्या आत लशीचा पुरवठा करू असंही मोनसेफ सलोई यांनी सांगितलं. एफडीएकडून सल्लागार 8 ते 10 डिसेंबर दरम्यान फायझर आणि मॉडर्ना कंपन्यांची भेट घेऊन या लसीच्या मंजुरीबाबत चर्चा करतील. त्यानंतर 11 किंवा 12 डिसेंबरपासून लस देण्यास सुरुवात होऊ शकते असाही दावा यावेळी करण्यात आला आहे. हे वाचा-कोरोनावर 94.5 % प्रभावी Vaccine ची किंमत तापाच्या औषधापेक्षाही कमी मॉडर्ना नावाच्या कंपनीनं ही लस तयार केली असून 94.5 टक्के ही लस चाचणीमध्ये यशस्वी झाल्याचा दावा कंपनीकडून केला जात आहे. मीडिया रिपोर्टनं दिलेल्या माहितीनुसार मॉडर्ना कंपनीने तयार केलेली लस ही 94.05 टक्के परिणामकारक असल्याचा दावा केला आहे. या लशीसाठी अमेरिकेच्या प्रशासनानं 25 ते 37 डॉलर मोजले असल्याचंही सांगितलं जात आहे. या लशीची किंमत लोकांची मागणी किती आणि कशी असेल त्यावर ठरवण्यात येईल अशी माहिती कंपनीच्या सीईओंनी दिली आहे. भारताने ऑर्डर केले कोरोना लशीचे 150 कोटी डोस भारतासह जगभरात कोरोना लशीच्या (Corona Vaccine) चाचण्या सुरू आहेत. अनेक देशांमध्ये कोरोना लस निर्मितीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. मॉडर्ना (Moderna) आणि फायझर (Pfizer Vaccine) कंपन्यांनी आपल्या लशीच्या चाचण्या (Clinical human trials) पूर्ण झाल्याचा दावादेखील केला. आता Covid Vaccine च्या खरेदीसाठी देशा-देशांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. भारतात यापैकी किती लशी पोहोचणार आणि कधी हा खरा प्रश्न आहे. लशीसंदर्भात चांगली बातमी अशी की भारताने अगोदरच 150 कोटींहून अधिक लशींचे डोस मिळावेत म्हणून अॅडव्हान्स बुकिंग करत नंबर लावलेला आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Corona vaccine

    पुढील बातम्या