मुंबई, 10 सप्टेंबर : जगभऱात कोरोनाचं थैमान सुरू असताना ऑक्सफोर्डच्या लशीकडे सगळ्यांचं लक्ष होतं. मात्र ही लस येण्यासाठी आता आणखीन उशीर होण्याची शक्यता आहे. या लशीची तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल थांबवण्यात आली असून सीरम इन्स्टीट्यूटला नोटीस पाठवण्यात आली होती. या नोटीसवर सीरम इंस्टीट्यूटनं आपली बाजू मांडली आहे.
ऑक्सफर्ड कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्यातल्या चाचण्या सुरू असतानाच एका व्यक्तीची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे ब्रिटनमध्ये या लशीचं ट्रायल तात्पुरत थांबवण्यात आलं आहे. अॅस्ट्रॅजेनेका (AstraZeneca), ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी (Oxford university) ने तयार केलेली ही लस. ज्यामध्ये पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटचीही भागीदारी आहे. भारतातही या लशीचं ट्रायल सुरू आहे.
हे वाचा-भारताच्या तिन्ही लशींचा पहिला टप्पा यशस्वी, वाचा कधी येणार बाजारात
ऑक्सफोर्डच्या कोविड-19 लसीच्या वादावरून सीरम इंस्टीट्यूटला बुधवारी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून (DCGI) कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. या नोटीसेमध्ये रुग्णांच्या सुरक्षेबाबत शंका उपस्थित करण्यात आली. नोटीस मिळाल्यानंतर काही तासांत या संस्थेनं एक निवेदन जारी केलं आहे.
DCGI ने मानवी चाचणी थांबवू नये असं कुठेही या नोटीसमध्ये म्हटलेलं नाही. आम्ही DCGI च्या सूचनांचं पालन करत आहोत. DCGI ला लशीच्या सुरक्षेबाबत काही समस्या असल्यास त्याचं निराकरण आणि DCGIच्या प्रोटोकॉलचं पालनही करू असं सीरमने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
हे वाचा-कोरोना प्रकोपामुळे महाराष्ट्रातील या शहरांना धोका, ग्रामीण भाग बनतोय हॉटस्पॉट
सीरम कंपनीने अद्याप मानवी चाचणीतील नवीन माहिती दिली नसल्याच्या आरोप DCGI कडून करण्यात आला आहे. या लशीची इतर देशात सुरू असणारी चाचणी थांबवण्यात आली आहे. ही लस सर्वात अॅडव्हान्स असल्याचा दावा केला जात होता. सर्वांनाच या लशीची प्रतीक्षा होती. आता ही लस उपलब्ध होण्यासाठी आणखीन बराच कालावधी लागू शकतो असंही सांगितलं जात आहे.
भारतात सीरम इंस्टिस्ट्यूटने ऑक्सफोर्डसोबत एक करार केला होता. कोविड-19च्या लशीचे एक अब्ज डोसचं भारतात उत्पादन केलं जाणार होतं. त्यासाठीच भारतात मानवी चाचणी सुरू आहे. मात्र सध्या या लशीच्या मानवी चाचणीवर ब्रेक लागल्यामुळे लस येण्यासाठी उशीर होईल असा कयास व्यक्त केला जात आहे.