Home /News /coronavirus-latest-news /

Pfizer कोरोना लशीला जागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी, भारतात आज मोठा निर्णय होणार

Pfizer कोरोना लशीला जागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी, भारतात आज मोठा निर्णय होणार

अमेरिका, ब्रिटन, युरोपियन युनियनसह 12 देशांमध्ये फायझर-बायोटेक लशीला यापूर्वीच आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे.

    नवी दिल्ली, 01 जानेवारी: फाइजर आणि बायोटेक कंपनीच्या कोरोना लशीला जागतिक आरोग्य संघटनेकडून परवानगी मिळाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली असून भारतात अद्याप ही मिळाली नाही. या संदर्भात मोदी सरकार महत्त्वपूर्ण आज निर्णय़ घेण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने फायझर आणि बायोटेकच्या कोरोना व्हायरस लसीचा आणीबाणी वापर करण्यास परवानगी दिली आहे. मंजुरीनंतर, डब्ल्यूएचओने सांगितले की ते जगभरातील त्याच्या प्रादेशिक कार्यालयांद्वारे लसीच्या फायद्यांविषयी तेथील देशांशी चर्चा करण्यात येईल. युनायटेड नेशन्सच्या या मंडळाच्या मंजुरीनंतर, जगभरातील देशांमध्ये फायझरच्या कोरोना लसीच्या वापरासाठी मार्ग खुला झाला आहे. त्याचबरोबर कोरोना व्हायरस लशीच्या आपत्कालीन वापरासंदर्भात भारतही मोठा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही कोरोनाची लस लवकरात लवकर गरीबांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपत्कालीन उपयोग करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या यादीमध्ये देशाचं नाव असणाऱ्यांना लशीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देता येणं सहज शक्य होणार आहे. हे वाचा-धक्कादायक, ही लॅब रुग्णांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट करायची निगेटिव्ह, मोठं रॅकेट उघड अमेरिका, ब्रिटन, युरोपियन युनियनसह 12 देशांमध्ये फायझर-बायोटेक लशीला यापूर्वीच आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. भारतात ही मिळणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. फायझरची कोरोना लस आपत्कालीन वापरासाठी पहिल्यांदा ब्रिटनमध्ये मंजुरी मिळाली होती. तर अमेरिकेत परवानगी मिळाल्यानंतर एका नर्सला ही लस दिल्यानंतर कोरोनाची लागण झाली होती. या लशीला भारतात परवानगी देण्याबाबत आज महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत आपत्कालीन वापरासाठी मंजुरी द्यायची की नाही या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, फायझर आणि भारत बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या लसींचा आपत्कालीन वापरासाठी उपयोग करण्याबाबत आज चर्चा होणार आहे त्यानंतर निर्णय घेण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Corona vaccine, Coronavirus

    पुढील बातम्या