नवी दिल्ली, 09 ऑक्टोबर : कोरोनाचा विळखा जगभरात अधिक घट्ट होत आहे. याच दरम्यान सगळेजण लस कधी येणार याच्या प्रतीक्षेत असतानाचा अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीने लशीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. गुरुवारी अमेरिकन औषधनिर्माण करणाऱ्या मॉडर्ना कंपनीने गुरुवारी एक प्रेसनोट जारी केली आहे. यामध्ये लशीसंदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे तर औषध कंपन्याना मोठा फायदा होऊ शकेल असं म्हटलं जात आहे.
मॉडर्ना कंपनीचं कोरोनाच्या लशीच्या चाचणीवर काम सुरू आहे. याशीचं पेटंट करण्यासाठी कंपनीकडून इतर कंपन्यांवर कोरोनाच्या काळात दबाव आणणार नाही. असं कंपनीने काढलेल्या प्रेसनोटमध्ये म्हटलं आहे. कोरोना साथीच्या लढा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
US नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅलर्जी अॅण्ड इन्फेक्टीव्ह डिसिसीज आणि अमेरिकन बायोटेक कंपनी मोडर्ना यांनी मिळून कोरोनावर लस तयार केली आहे. ही लस सध्या पहिल्याच टप्प्यातील चाचणी करत आहे. या लशीमुळे वृद्धांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचं निरीक्षणात दिसून आलं आहे.
While the pandemic continues, Moderna will not enforce our COVID-19 related patents against those making vaccines intended to combat the pandemic. Read our statement here: https://t.co/j8GFZJZ3rEpic.twitter.com/RqbankQXVA
हे वाचा-कोरोना काळात आई-बाबा झाल्यास या देशाचे सरकार देणार बोनस, आर्थिक मदतीची घोषणा
'न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन' मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार mRNA-1273 ही लस आतापर्यंत ज्या व्यक्तींना देण्यात आली त्या व्यक्तींवर या लशीचा खूप चांगला परिणाम दिसून आला आहे. एनआयएआयडी संशोधकांच्या मते, वृद्ध लोकांमध्ये कोविड -19 चा धोका अधिक असतो आणि हा धोका नष्ट करणं, कमी करणं यासाठी ही लस महत्त्वपूर्ण आहे.
भारतात जवळपास 68 लाखहून अधिक रुग्ण आहेत. देशाचा पॉझिटिव्हिटी रेट 8.3% असून 100 टेस्टपैकी आठ लोकं कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. देशात अजूनही 9 लाख 2 हजार 425 अॅक्टिव्ह केस आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडु सह 10 राज्य अशी आहे जेथे 77% अॅक्टिव्ह केसेस आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.