COVID-19 : रशियात लशीच्या उत्पादनाचा पहिला टप्पा पूर्ण, भारतातही तयार होणार?

COVID-19 : रशियात लशीच्या उत्पादनाचा पहिला टप्पा पूर्ण, भारतातही तयार होणार?

भारतीय कंपन्यांनी रशियाच्या या लशीचं उत्पादन करण्यासाठी उत्साह दाखवला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 ऑगस्ट : कोरोनाच्या लशीच्या स्पर्धेत सर्वात पहिला नंबर रशियानं लावला. रशियाच्या लशीच्या उत्पादनातील पहिला टप्पा शनिवारी पूर्ण झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र अनेक वैज्ञानिकांनी या लशीच्या सुरक्षेबाबत शंका उपस्थित केली आहे. तर काही वैज्ञानिकांनी या लशीनं तिसरा टप्पा वगळल्याचा दावाही केला आहे. Sputnik V लस या महिन्याच्या अखेरपर्यंत बाजारात उपलब्ध होईल असा दावा आरोग्य विभागानं केला आहे.

कोरोनाची लस स्तुतनिक व्हीमध्ये आता भारतीय कंन्यांनीही स्वारस्य घेतलं आहे. भारतीय कंपन्यांनी रशियाच्या या लशीचं उत्पादन करण्यासाठी उत्साह दाखवला आहे. पहिल्या दोन चाचणीच्या टप्प्यातील माहिती रशियन डायरेक्टर इंवेस्टमेंट फंड RDIF ने भारतीय कंपन्यांना द्यावी अशा मागणी करण्यात आली आहे.

हे वाचा-'...तर या लसीमुळे दोन वर्ष लोकं राहणार कोरोनामुक्त', रशियाचा दावा

भारतीय कंपन्या यासंदर्भात RDIF शी संपर्कात आहेत. सध्या याबाबत चर्चा सुरू आहे. लशीच्या चाचणीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निकाल या कंपन्यांनी मागितले आहेत. RDIF या कंपनीनं कोरोनाच्या लशीच्या संशोधनासाठी भांडवल दिलं होतं. ही लस निर्यात आणि घुरगुती वापरासाठी वापरण्यात येऊ शकते असंही रशियाच्या आरोग्य मंत्र्यांनी माहिती दिली आहे. RDIF सोबत भारतीय कंपन्यांची चर्चा यशस्वी झाली तर येत्या काही काळात ही लस भारतात तयार केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे वाचा-...तरच भारतात दिली जाणार रशियन कोरोना लस; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट

रशियाने जगातील सर्वात पहिली कोरोना लस (russian corona vaccine) तयार करून ती बाजारात आणण्याची तयारीही सुरू केली. लशीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू करण्यात आलं आहे. 20 देशांनी या लशीच्या अब्जावधी डोसची आधीच ऑर्डर दिली आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) रशियन लशीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्हं उपस्थित करत जगाला सावध केलं आहे.

जगातील 9 कोरोना लशी क्लिनिकल ट्रायलच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. मात्र यामध्ये रशियाच्या स्पुतनिक व्ही (Sputnik V) या लशीचा समावेश नाही. या लशीबाबत आपल्याकडे काहीही माहिती नाही. त्यामुळे ही लस किती सुरक्षित असेल हे सांगू शकत नाही, असं WHO ने म्हटलं आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 16, 2020, 7:40 AM IST

ताज्या बातम्या