कोरोनाची लस अंतिम टप्प्यात, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

कोरोनाची लस अंतिम टप्प्यात, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

कोरोनाची लस कधी येणार? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिली महत्त्वाची माहिती

  • Share this:

नवी दिल्ली, 24 सप्टेंबर : जगभरात कोरोनाचा विस्फोट होत आहे आणि सर्वात चिंतेची बाब म्हणजे आता कोरोना होऊन बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा दुसऱ्यांदा कोरोना होण्याचा धोका वाढत चालल्यानं चिंता व्यक्त होत आहे. दुसरीकडे रशियानं लशीच्या स्पर्धेत पहिला क्रमांक लावला असला तरी त्यावर अनेक सवाल अद्यापही उपस्थित केले जात आहेत. या कोरोनावर लस कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष असतानाच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी कोरोनाच्या लशीसंदर्भात माहिती दिली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेदरम्यान कोरोना लशीसंदर्भात माहिती दिली. जॉन्सन आणि जॉन्सन कंपनीनं तयार केलेल्या लशीची मानवी चाचणी यशस्वी होत आहे. ही चाचणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे असा अशी माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. त्यासोबत अमेरिकेतील नागरिकांना चाचणीसाठी नोंदणी करण्याचं आवाहनही ट्रम्प यांनी केलं आहे.

हे वाचा-एक खेकडा; कोरोना लशीत निभावणार महत्त्वाची भूमिका

सध्या अमेरिकेतही निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना विषाणूवर मात देण्यासंदर्भातील योजनाही सांगितली आहे. जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीकडूनही आता लवकर लस उपलब्ध होईल अशी सर्वांची अपेक्षा आहे.

कोरोनाच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णांच्या संख्येमुळे सर्वजण लशीची आतूरतेनं वाट पाहात आहेत. दरम्यान, एप्रिल पर्यंत कोरोना विषाणूची लस सर्व अमेरिकन लोकांना उपलब्ध होईल, असा दावा यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन (सीडीसी) चे संचालक रॉबर्ट रेडफिल्ड यांनी केला आहे. गेल्या आठवड्यात त्यांचे विधान चुकीच्या पद्धतीने घेण्यात आले असल्याचे ते म्हणाले. कोरोनाची लस 2021 मध्ये येईल याचा अर्थ असा नव्हे की लस तेव्हा येईल तर अमेरिकेतील नागरिकांसाठी 2021 एप्रिलपर्यंत ती उपलब्ध होऊ शकेल असा दावा अमेरिकेचे CDC प्रमुख रॉबर्ट रेडफिल्ड यांनी केला आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 24, 2020, 9:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading