मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

स्वदेशी कोरोना लस कधी पर्यंत लाँच होणार? भारत बायोटेक दिली महत्त्वाची माहिती

स्वदेशी कोरोना लस कधी पर्यंत लाँच होणार? भारत बायोटेक दिली महत्त्वाची माहिती

जगाला सध्या फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर हवं आहे. आणि तो प्रश्न म्हणजे कोरोनावर लस केव्हा येणार? जगातले अनेक देश यावर संशोधन करत असून अनेक लशींच्या चाचण्या या अंतिम टप्प्यात आल्या आहेत.

जगाला सध्या फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर हवं आहे. आणि तो प्रश्न म्हणजे कोरोनावर लस केव्हा येणार? जगातले अनेक देश यावर संशोधन करत असून अनेक लशींच्या चाचण्या या अंतिम टप्प्यात आल्या आहेत.

शेवटच्या टप्प्यातील चाचणीचा डेटा हा सुरक्षित आणि यशस्वीरित्या पार पडल्यानंतर ही लस बाजारात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

नवी दिल्ली, 01 नोव्हेंबर : स्वदेशी कोरोनाची लस कधी येणार याकडे सर्वांचे डोळे लागलेले असतानाच आता भारत बायोटेक कंपनीतील अधिकाऱ्यानं महत्त्वाची माहिती दिली आहे. नुकतीच भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेल्या कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला परवानगी मिळाल्यानंतर ही सर्वात महत्त्वपूर्ण माहिती असल्याचं समोर येत आहे.

2021च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत भारतातील नागरिकांसाठी स्वदेशी लस उपलब्ध असेल अशी माहिती भारत बायोटेक कंपनीच्या अधिकाऱ्याने दिली आहे. सध्या कंपनीचे लक्ष्य देशभरातील लसीची टप्पा यशस्वीरित्या पूर्ण करण्यावर आहे. भारत बायोटेकने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) यांच्या संयुक्त विद्यमाने ही लस तयार केली. कोवाक्सिन SARS-Cov-2 ची इनअॅक्टिव्हेटेड स्‍ट्रेनमधून तयार केली आहे.

शेवटच्या टप्प्यातील चाचणीचा डेटा हा सुरक्षित आणि यशस्वीरित्या पार पडल्यानंतर ही लस बाजारात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 2021च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत ही लस नागरिकांना उपलब्ध होऊ शकेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. या लशीची चाचणी साधारण 14 राज्यांमध्ये 24 ते 25 वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये सुरू आहे. प्रत्येक रुग्णालयात जवळपास 2000 स्वयंसेवकांवर या लशीची चाचणी सध्या सुरू आहे.

हे वाचा-तंदुरुस्त माणसाच्या शरीराचं सरासरी तापमान गेल्या दोन दशकांपासून कमी का होतं?

या लशीचं उत्पादन करण्यात आल्यानंतर सरकारी रुग्णालयांमध्ये तसेच सरकारी रुग्णालयांना औषध पुरवणाऱ्या दुकानांना किंवा कंपन्यांना या लशीचा पुरवठा करण्यासंदर्भात विचार सुरू आहे. या लशीची किंमत किती असेल याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.

सीरमची लस कधी येणार?

एसआयआय निर्मित ऑक्सफर्ड कोरोनाव्हायरस लशीच्या 100 दशलक्ष डोसची पहिली तुकडी 2021 च्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या तिमाहीत उपलब्ध होईल. ऑक्सफर्डची कोरोना लस अत्यंत किफायतशीर होईल, असेही पूनावाला म्हणाले. पूनावाला म्हणाले, "आम्ही पहिल्यांदा 100 दशलक्ष डोस देण्याच्या उद्दिष्टावर काम करत आहोत. ते 2021 च्या Q2-Q3 पर्यंत उपलब्ध होईल."

First published:

Tags: Corona vaccine, Corona virus in india