मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

आनंदाची बातमी! फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध होणार कोरोनाच्या 'या' 2 लशी

आनंदाची बातमी! फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध होणार कोरोनाच्या 'या' 2 लशी

जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनावर औषध शोधण्यासाठी जगातले अनेक देश प्रयत्न करत आहेत. मात्र अनेक प्रगत देशांमध्ये कोरोना लशीच्या विरोधात आंदोलन उभं राहिलं असून WHOला त्याची दखल घ्यावी लागली आहे.

जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनावर औषध शोधण्यासाठी जगातले अनेक देश प्रयत्न करत आहेत. मात्र अनेक प्रगत देशांमध्ये कोरोना लशीच्या विरोधात आंदोलन उभं राहिलं असून WHOला त्याची दखल घ्यावी लागली आहे.

ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस कोरोनाचा विस्फोट होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar
नवी दिल्ली, 29 ऑगस्ट : जगभरात कोरोनाचा विस्फोट होत आहे. दरम्यान कोरोना लशीच्या मानवी चाचण्यांचं परीक्षण जसजसं पुढे जातंय तसं लस बाजारात लवकर उपलब्ध होण्याच्या आशाही वाढताना दिसत आहे. रशियानं एक लस आणली असून ती ऑक्टोबरच्या सुरुवातील बाजारात उपलब्ध होईल असा दावा केला आहे. भारतात कोरोनाची लस कधी येणार असा सवाल उपस्थित होत असताना आता एक आनंदाची बातमी मिळत आहे. भारतात 2021 च्या सुरूवातीला कोरोनाच्या दोन लशी बाजारात उपलब्ध होतील अशी माहिती मिळाली आहे. बर्नस्टेन यांनी एका अहवालात दिलेल्या माहितीनुसार जागतिक स्तरावर फेब्रुवारी-मार्च पर्यंत 4 लशी उपलब्ध होतील. यापैकी दोन लशी ‘एस्ट्राजेनेका व ऑक्सफोर्ड व्हायरल वेक्टर लस आणि नोवावॅक्सची प्रोटीन सब्यूनिट लशीसाठी भारतनं भागीदारी केली आहे. हे वाचा-COVID-19: राज्यात 331 जणांचा मृत्यू, नव्या रुग्णांचीही पुन्हा एकदा उच्चांकी भर अहवालानुसार या दोन्ही लशींच्या मानवी चाचणीमध्ये सुरक्षितता आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची क्षमता असल्याचं सांगितलं जात आहे. या लशीच्या आतापर्यंतच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. या दोन्ही लशी साधारण 2021 मार्चपर्यंत भारतात उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे. या लशीची किंमत 225 ते 250 रुपये असू शकते असाही कयास आहे. सीरम इंस्टिट्यूट साधारण 2021मध्ये 60 कोटी तर 2022 पर्यंत एक अब्ज लशीचं उत्पादन होऊ शकतं अशी माहिती अहवालातून समोर आली आहे. हे वाचा-लशीनेही कोरोनाला कायमचं हरवणं अशक्य; 50 दिवसांत पुन्हा होऊ शकतो कोरोना भारतात काय आहे कोरोनाची स्थिती ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस कोरोनाचा विस्फोट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार 24 तासांत सलग तिसऱ्या दिवस 76 हजार 472 नवीन लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनामुळे 24 तासांत 1,021 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत मृत्यूची आकडेवारी 62,550 वर पोहोचली आहे. तर देशात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 34 लाख 63 हजार 973 वर पोहोचली आहे. 7 लाख 52 हजार 424 रुग्णांवर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळाली आहे.
First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus

पुढील बातम्या