Corona vaccination : कोरोना लशीचा तुटवडा दूर होणार; मोदी सरकारने घेतले 2 मोठे निर्णय

Corona vaccination : कोरोना लशीचा तुटवडा दूर होणार; मोदी सरकारने घेतले 2 मोठे निर्णय

कोरोना लशींसाठी (Corona vaccine) मोदी सरकारने मोठं पाऊल उचललं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 एप्रिल : देशात कोरोनाची परिस्थिती भयंकर होत असताना आता मोदी सरकारचं टेन्शन वाढलं आहे. त्यामुळे लसीकरणाचा (Corona vacciation) वेग वाढवला जातो आहे. पण अशात लशींचा (Corona vaccine) तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे आता मोदी सरकाने निर्णायक असं पाऊल उचललं आहे. देशातील कोरोना लशीचा (Covid 19 vaccine) तुटवडा दूर करण्यासाठी दोन मोठे निर्णय केंद्र सरकारने घेतले आहेत.

मोदी सरकारने कोरोना लशीचं उत्पादन वाढवण्यासाठी अनुदान दिलं आहे. केंद्र सरकारमार्फत कोरोना लशीसाठी 65 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. भारत बायोटेकला बंगळुरू, हाफकिनमध्ये लशीच्या निर्मितीसाठी नवीन संसाधन उभारणीसाठी 65 कोटी रुपये दिले जात आहेत.

सध्या कोवॅक्सिनचं महिन्याला एक कोटी डोसची निर्मिती केली जाते. जुलैपर्यंत हे प्रमाण सहा ते सातपटीने वाढवण्याचं उद्दिष्ट आहे. मे-जूनमध्ये दुप्पट डोसची निर्मिती केली जाईल आणि त्यानंतर जुलै-ऑगस्टपमध्ये लशींचं उत्पादन सहा ते सातपटीपर्यंत वाढवलं जाईल.

हे वाचा - कोरोना लशीसाठी पुण्याच्या पूनावालांची धडपड; अमेरिकेसमोर हात जोडत केली मोठी मागणी

आतापर्यंत केंद्र सरकार लस उत्पादक कंपन्यांकडून कमीत कमी किमतीत लस खरेदी करून त्या आवश्यकतेनुसार राज्यांना पुरवत होतं. पण आता सरकारनेच या लस उत्पादक कंपनीला लस उत्पादन वाढवण्यासाठी निधी पुरवण्याचा निर्णय घेतला.

तर दुसरीकडे देशातील दुसरी कोरोना लस कोविशिल्डचं उत्पादन वाढवण्यासाठी पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने अमेरिकेकडे मदत मागितली आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ यांनी अमेरिकेतील कच्च्या मालाच्या निर्यातीवरील बंदी हटवावी अशी मागणी केली आहे. ट्वीट करत त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना हात जोडून विनंती केली आहे.

हे वाचा - राज्यात Remdesivir कधीपर्यंत होणार उपलब्ध? बैठकीनंतर मंत्र्यांनी दिलं उत्तर<

देशातील कोरोनाचं भयंकर रूप पाहता देशात अनेक राज्यांनी संचारबंदी, लॉकडाऊन असे कठोर निर्बंध लागू केले आहेत. शिवाय जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करण्याचा प्रयत्न आहे. देशात सध्या कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लशी दिल्या जात आहेत. तिसरी लस रशियाच्या स्पुतनिक V च्या आपात्कालीन वापरालासुद्धा मंजुरी दिली आहे. येत्या काही दिवसांत आणखी विदेशी लशींना परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. या लशींना परवानगी देण्याची प्रक्रियाही जलद करण्यात आली आहे.

Published by: Priya Lad
First published: April 16, 2021, 6:29 PM IST

ताज्या बातम्या