नवी दिल्ली, 02 जानेवारी : भारतात आता कोरोना लशीचं ड्राय रन होणार आहे. जगातील सर्वात मोठ्या प्रमाणात हे ड्राय रन होणार असल्यानं त्या दृष्टीनं केंद्र सरकारनं तयारी केली आहे. आजपासून या मोहिमेला सुरुवात होणार आहे. कोरोनाची लस सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी केंद्र सरकारनं नियोजन केलं आहे. या संदर्भात, राष्ट्रीय कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ विनोद पॉल यांनी न्यूज 18 सोबत बोलताना महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
देशातील सर्व जिल्हे आणि केंद्र शासित प्रदेशातील 116 जिल्हे आणि 259 ठिकाणी आज कोरोणा लसीचे सराव अभियान होणार आहे. आजपासून यासाठी नोंदणी करणण्यात येणार आहे. आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने आज या मोहिमेत सहभागी होणार आहेत. पहिल्याच टप्प्यात साधारणपणे देशातील 30 कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचा मानस आहे. या लोकांची प्राथमिक टप्प्यात निवड करण्यात आली आहे.
Dry run for #COVID19 vaccine administration to be conducted in all States/Union Territories today in 116 districts across 259 sites: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/v8pEwnzwXh
— ANI (@ANI) January 2, 2021
हे वाचा-Corona Vaccine Update: सीरमनंतर Made in India लस आहे रांगेत; पण...
दिल्लीमधील तीन ठिकाणी, उत्तर प्रदेशात 6 केंद्रांवर बिहारमध्ये तीन ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये 9 केंद्रांवर तर मुंबईत 5 ठिकाणी यासह इतर ठिकाणी देखील अशाच पद्धतीनं ड्राय रन करण्यात येणार आहे. आतापर्यंत पंजाब, आसाम, गुजरात आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांत कोरोना लशीचं ड्राय रन करण्यात आलं आहे.या मोहिमेचे आतापर्यंत सर्व चांगले निकाल समोर आले आहेत. त्यामुळे हे देशभरात राबवण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक विशेष पथकही नेमलं आहे. या पथकाचं संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने नजर असणार आहे.
ड्राय रनदरम्यान कोरोना लस ठेवण्यासाठी आवश्यक असणारं कोल्ड स्टोरेज ते लस केंद्रांपर्यंत पोहोचवणं इथपर्यंतचं नियोजन करण्यात आलं आहे. याशिवाय टीकाकरण केंद्रांवर गर्दी होऊ नये आणि कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक त्या नियमांचं पालन करण्यासाठी लोकांना गाइड करणं यासाठी देखील नियोजन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
लस पुरवठा यंत्रणेबद्दल डॉ. पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात 31 मोठे स्टॉक हब असतील. या स्टॉक हबमधून सर्व राज्यात 29 हजार लसीकरण केंद्रांवर लस पुरवठा करण्यात येईल. सर्वात पहिली लस ही आरोग्य कर्मचारी आणि वयोवृद्ध नागरिकांना देण्यावर भर असेल. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना ही लस पहिल्यांचा देण्यासाठी प्राधान्य दिलं जाईल. याशिवाय हाय रिस्क असणाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, PM narendra modi