मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

कोरोनाची लस तयार करणाऱ्या मुंबईतील 'या' फॉर्मा कंपनीवर सायबर हल्ला, 15 दिवसातील दुसरा प्रकार

कोरोनाची लस तयार करणाऱ्या मुंबईतील 'या' फॉर्मा कंपनीवर सायबर हल्ला, 15 दिवसातील दुसरा प्रकार

याआधी डॉक्टर रेड्डीज लॅबवर (Dr. reddy's Lab) सायबर हल्ला झाल्यानंतर आता मुंबईतील प्रसिद्ध फार्मा कंपनी लुपिनवरही (lupin) सायबर हल्ला झाला आहे.

  • Published by:  Priyanka Gawde
मुंबई, 07 नोव्हेंबर : कोरोनाव्हायरसशी (coronavirus) दोन हात करण्यासाठी सध्या सर्व देश लस शोधण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी जगातली नावाजलेल्या कंपन्या दिवसरात्र एक करून काम करत आहेत. मात्र यातच सध्या हॅकर्सनं या फॉर्मा कंपन्यांवर नजर ठेवली आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतातील फॉर्मा कंपन्यांवर सायबर हल्ले केले जात आहे. याआधी डॉक्टर रेड्डीज लॅबवर (Dr. reddy's Lab) सायबर हल्ला झाल्यानंतर आता मुंबईतील प्रसिद्ध फार्मा कंपनी लुपिनवरही (lupin) सायबर हल्ला झाला आहे. याआधी 15 दिवसांपूर्वी डॉक्टर रेड्डीज लॅबवर हल्ला झाला होता. औषध उद्योगांशी संबंधित अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत पाश्चात्य देशातील प्रसिद्ध फॉर्मा कंपन्यांवर सायबर हल्ले झाले होते. मात्र भारतातील हा पहिलाच प्रकार आहे. हॅकर्स सध्या महत्त्वपूर्ण डेटाला लक्ष्य करत आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत असे सायबर हल्ले वाढत जातील. वाचा-खोकल्यानंतर किती वेळात आणि कसा पसरतो कोरोना? संशोधनातून समोर आली नवीन माहिती असे मानले जाते की, हॅकर्स औषधाविषयी माहिती मिळवण्यासाठी सायबर हल्ले करतात. एका भारतीय लस निर्माण संस्थेच्या अधिकाऱ्यानं सांगितले की, देशातील बहुतेक फॉर्मा कंपनी आपला डेटा आणि माहिती डिजिटल स्पेसमध्ये ठेवते. मात्र डिजिटायजेशनमुळे हा डेटा धोक्यात आला आहे. जगाला सायबर सुरक्षा देणाऱ्या कॅस्परस्कीनं भारताया सायबर हल्ल्यांसाठी सहावा सर्वात संवेदनशील देश असल्याचे म्हटले होते. वाचा-ना लस ना औषध, आता 'या' Antibodies कोरोनाचा कायमचा खात्मा करणार काही तज्ज्ञांच्या मते, भारतातील फॉर्मा कंपन्या स्वस्त दरात लस आणि औषधं उपलब्ध करून देण्यावर भर देत आहे. त्यामुळे हॅकर्स अशा कंपन्यांना टार्गेट करत आहेत. याआधी डॉक्टर रेड्डीज लॅबवर सायबर हल्ला झाला तेव्हा त्याआधीच भारतात रशियन कोरोना लस स्पूतनिक-Vच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षणाला परवानगी दिली होती.
First published:

Tags: Corona vaccine

पुढील बातम्या