मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

लस घेताना थेट शेतात पळत सुटली महिला; धाय मोकलून रडतानाचा अजब VIDEO Viral

लस घेताना थेट शेतात पळत सुटली महिला; धाय मोकलून रडतानाचा अजब VIDEO Viral

लसीकरण मोहिमेचा आतापर्यंत अजब VIDEO

लसीकरण मोहिमेचा आतापर्यंत अजब VIDEO

लसीकरण मोहिमेचा आतापर्यंत अजब VIDEO

  • Published by:  Meenal Gangurde

जमुई, 10 डिसेंबर : देशात सध्या ओमायक्रॉनची  (Omicron) टांगती तलवार आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. असं असलं तरी अनेक ग्रामीण भागात लसीकरण करून घेण्यास नकार दिला जात आहे. त्यासंदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral On Social Media) होत आहे.

देशभरात कोरोना लसीकरणाबाबात जागरूकता अभियान सुरू आहे. विविध माध्यमांतून हा प्रसार केला जात आहे. बिहारमधील जमुई या गावात लसीकरण मोहीम राबवली जात होती. मात्र त्यावेळी अनेकांनी लस घेण्यास नकार दिला. एका महिलेने लस न घेण्यासाठी रडून रडून आकाश-पाताळ एक केलं. ती ढसा ढसा रडत होती. तिला 4 ते 5 जणांनी पकडलं तेव्हा कुठे लस दिली गेली.

ही घटना बिहारमधील जमुई जिल्ह्यातील सिकंदरा भागातील एका छोट्याशा गावातील आहे. ही महिला लस घेताना प्रचंड घाबरत होती. लस पाहून ती शेतात पळू लागली. शेवटी शेतात काही जणांनी तिला पकडलं.

" isDesktop="true" id="641894" >

एकीकडे आरोग्य कर्मचारी इंजेक्शन हातात घेऊन उभी होती, तर दुसरीकडे ही महिला धाय मोकलून रडत होती. हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू आवरत नाहीये, तर अनेकांनी हे गंभीर असल्याचं सांगितलं. लोकांच्या मनात लसीबद्दल विश्वास नसल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.

हे ही वाचा-आता लहान मुलांना विळख्यात घेतोय कोरोना; आठवडाभरात झालेली स्थिती चिंताजनक

दरम्यान कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) हळूहळू आटोक्यात येऊ लागलेली असतानाच सर्वत्र तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात होती. सुदैवाने ती लाट आली नाही; मात्र कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवलीच. एक-दोन करता करता भारतात सापडलेल्या ओमिक्रॉनबाधितांची (Omicron) संख्या 23 वर पोहोचली आहे. आता या रुग्णांमध्ये असं काही दिसून आलं ज्यामुळे चिंता आणखी वाढली आहे. भारतात सापडलेल्या बहुतेक ओमिक्रॉन रुग्णांमध्ये लक्षणं दिसत नाही आहेत आणि ही धोक्याची घंटा आहे (Asymptomatic omicron cases in india).

First published:

Tags: Bihar, Videos viral