Home /News /coronavirus-latest-news /

Corona Vaccine new Rule: 16 मार्चपासून 12 वर्षांवरच्या सर्वांना मिळणार लस; ज्येष्ठांसाठीही नियम बदलला

Corona Vaccine new Rule: 16 मार्चपासून 12 वर्षांवरच्या सर्वांना मिळणार लस; ज्येष्ठांसाठीही नियम बदलला

Corona च्या Booster Dose संदर्भातही नियमात बदल करण्यात आला आहे. आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीय (Dr Mansukh Mandaviya) यांनी ही माहिती दिली आहे.

    नवी दिल्ली, 14 मार्च : देशातल्या कोरोनाबाधितांची संख्या आता दिवसेंदिवस कमी होत असून, तिसरी लाट ओसरली आहे. त्यातच देशातल्या करोना प्रतिबंधक लसीकरणाची आकडेवारीही दररोज बऱ्यापैकी वाढत आहे. येत्या 16 मार्चपासून करोनाप्रतिबंधक लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीय (Dr Mansukh Mandaviya) यांनी दिली आहे. त्याअंतर्गत आता 12 ते 14 वर्षांच्या वयोगटालाही करोना प्रतिबंधक लस (Anti Covid Vaccination) दिली जाणार आहे. मांडवीय यांनी या संदर्भात ट्विट केलं असून, त्याबद्दलच्या माहितीचं वृत्त 'आज तक'ने दिलं आहे. 'बच्चे सुरक्षित तो देश सुरक्षित' असं लिहून डॉ. मनसुख मांडवीय यांनी हे ट्विट केलं असून, 12 ते 14 वयोगटाचं लसीकरण (Children Vaccination) 16 मार्चपासून सुरू होत असल्याबद्दल आनंद होत असल्याचं त्यांनी लिहिलं आहे. डॉ. मनसुख मांडवीय यांनी या ट्विटमध्येच दिलेल्या माहितीनुसार आता 60 वर्षांवरच्या सर्वच नागरिकांना करोना प्रतिबंधक लशीचा बूस्टर डोस (Booster Dose to all above 60 yrs) उपलब्ध होणार आहे. सध्या केवळ आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाइन वर्कर्स आणि को-मॉर्बिडिटी असलेल्या 60 वर्षांवरच्या व्यक्ती यांनाच बूस्टर डोस देण्यात येत होता. आता त्यावरचं बंधन काढून टाकण्यात आलं असून, 60 वर्षांवरच्या सर्व व्यक्ती 16 मार्चपासून कोरोना प्रतिबंधक लस घेऊ शकतील, असं डॉ. मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. Omicron आणि Delta पासून तयार झालेला कोरोनाचा मिश्र विषाणू पुन्हा वाढवणार चिंता? लसीकरणासाठी पात्र असलेल्या सर्वांनी लसीकरण करून घ्यावं, असं आवाहनही डॉ. मांडवीय यांनी या ट्विटच्या माध्यमातून केलं आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोकडून 14 मार्च रोजी सकाळी 10 वाजता प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात आलेल्या माहितीनुसार, त्याआधीच्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे केवळ 2503 नवीन रुग्ण आढळले. ही 680 दिवसांतली सर्वांत कमी संख्या आहे. तसंच देशात सध्या उपचार सुरू असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्या 36,168 एवढीच आहे. ही संख्या गेल्या 675 दिवसांतली नीचांकी आहे. देशातला रुग्ण बरे होण्याचा दर 98.72 टक्के असून, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट 0.47 टक्के आहे. आतापर्यंत देशभरात कोरोना प्रतिबंधक लशींचे 180 कोटी 19 लाख 45 हजार 779 डोसेस देऊन झाले आहेत. त्यापैकी 2 कोटी 12 लाख 66 हजार 554 प्रीकॉशन डोसेस अर्थात बूस्टर डोसेस आहेत. 15 ते 18 वर्षं वयोगटातल्या 5 कोटी 58 लाख 92 हजार 605 जणांना लशीचा पहिला, तर 3 कोटी 38 लाख 83 हजार 880 जणांनी दोन्ही डोसेस घेतले आहेत. कोणीच चोरी करू शकत नाही तुमची Bike, 300 रुपयांहून कमी खर्चात अशी ठेवा सुरक्षित 18 ते 44 वर्षं वयोगटातल्या 55 कोटी 33 लाख 47 हजार 902 जणांनी लशीचा पहिला, तर 45 कोटी 54 लाख 94 हजार 388 जणांनी दोन्ही डोसेस घेतले आहेत. 45 ते 59 वर्षं वयोगटातल्या 20 कोटी 25 लाख 37 हजार 734 जणांनी पहिला, तर 18 कोटी 28 लाख 1 हजार 487 जणांनी दोन्ही डोसेस घेतले आहेत. 60 वर्षांवरच्या 12 कोटी 65 लाख 93 हजार 557 जणांनी पहिला आणि 11 कोटी 38 लाख 50 हजार 979 जणांनी दोन्ही डोसेस घेतले असून, 1 कोटी 3 लाख 89 हजार 740 जणांनी बूस्टर डोसेसही घेतले आहेत.
    First published:

    Tags: Corona vaccine, Coronavirus

    पुढील बातम्या