मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Corona Update : गेल्या 24 तासांत राज्यातील रुग्णसंख्येत वाढ; मात्र मृतांचा आकडा घटला

Corona Update : गेल्या 24 तासांत राज्यातील रुग्णसंख्येत वाढ; मात्र मृतांचा आकडा घटला

सध्या अनेक भागांमध्ये अनलॉक सुरू आहे. त्यामुळे नागरिक आता घराबाहेर पडू लागले आहेत. त्यात पाऊस असल्याकारणाने नागरिकांना पर्यटनाचे वेध लागले आहे. परिणामी राज्यातील रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 20 जून : राज्यात दुसरी लाट ओसरत असल्याचं येणाऱ्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. आज राज्यात 9361 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मात्र शनिवारी ही संख्या 8 हजार 912 इतकी होती. त्यामुळे गेल्या 24 तासात राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली असल्याचं दिसत आहे. सध्या अनेक भागांमध्ये अनलॉक सुरू आहे. त्यामुळे नागरिक आता घराबाहेर पडू लागले आहेत. त्यात पाऊस असल्याकारणाने नागरिकांना पर्यटनाचे वेध लागले आहे. परिणामी राज्यातील रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Maharashtra coronavirus Update)

आज राज्यातील 9101 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 57,19,457 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.७६% एवढे झाले आहे.

असे असले तरी आज राज्यात 9361 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली असून आज 190 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९७% एवढा आहे. महाराष्ट्रात शनिवारी 8 हजार 912 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. आणि 257 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शनिवारच्या तुलनेत रविवारी मृतांचा आकडा घटल्याचं दिसत आहे.

हे ही वाचा-भयंकर! देशातल्या 'या' राज्यात आढळला ग्रीन फंगसचा पहिला रुग्ण

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,९५,१४,८५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी  ५९,७२,७८१ (१५.१२टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.  सध्या राज्यात ७,९६,२९७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,६८३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,३२,२४१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

देशात कोरोना व्हायरसची (COVID-19 cases in India ) दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. शनिवारी देशात 60 हजार 753 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 1,647 रुग्णांचा कोरोनानं मृत्यू झाला. पॉझिटिव्हीटी रेट 2.98 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, पॉझिटिव्हीटी रेट (daily positivity rate) सलग 12 दिवसांत 5 टक्क्यांच्या खाली आहे. मात्र असे काही राज्य आहेत तिथे अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या अधिक आहे. तर काही राज्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा कमी आहे.

First published:

Tags: Corona patient, Coronavirus cases