मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /साताऱ्यातील कुटुंबाला हलगर्जीपणा भोवला! कोरोना रुग्णावर गावातच केले अत्यसंस्कार, चिमुरडीसह 8 पॉझिटिव्ह

साताऱ्यातील कुटुंबाला हलगर्जीपणा भोवला! कोरोना रुग्णावर गावातच केले अत्यसंस्कार, चिमुरडीसह 8 पॉझिटिव्ह

साताऱ्यातील एका आजीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं माहित (Corona positive patient) असूनही संबंधित नातेवाईकांनी मृतदेह मूळगावी नेवून अत्यसंस्कार ( funeral in village) केले आहेत. या अंत्यविधीला मोठ्या संख्येनं गावकरीही हजर होते.

सातारा, 30 मार्च: महाराष्ट्रात कोरोना विषाणूची साथ वेगात पसरत असताना, साताऱ्यातील एका कुटुंबाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे. साताऱ्यातील एका आजीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं माहित (Corona positive patient) असूनही संबंधित नातेवाईकांनी मृतदेह मूळगावी नेवून अत्यसंस्कार (funeral in village) केले आहेत. या अंत्यविधीला मोठ्या संख्येनं गावकरीही हजर होते. अत्यंसंस्कार केलेली वृद्ध महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांची पायाखालची जमीनच सरकली आहे.

महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात भयानक प्रकार घडला आहे. येथील विंग गावात एका 78 वर्षीय कोरोना बाधित आजीवर गावातच अंत्यसंस्कार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वयोवृद्ध कोरोना बाधित आजीच्या अंत्यसंस्काराला गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे गावातील बऱ्याचा लोकांना कोरोनाची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अंत्यविधीला आलेल्यांपैकी 40 जणांची कोरोना चाचणी घेतली असता, त्यामध्ये एका लहान मुलीसह 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे विंग गावातील लोकांच्या चिंता वाढल्या आहेत.

(हे वाचा-वयोवृद्ध कोरोना रुग्णाची आत्महत्या, नागपूरातील घटनेने खळबळ)

आपली आई आजारी असल्यामुळे तिच्या मुलीने तिला फलटण तालुक्यातील हिंगणगावात उपचारासाठी नेलं होतं. यावेळी संबंधित वृद्ध महिलेची कोरोना चाचणी केली असताना त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. पण त्यांना पुढील उपचारासाठी कोरोना सेंटरमध्ये दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत आजीच्या कुटुंबीयांनी हा सर्व प्रकार गुप्त ठेवून मृतदेह मूळ गावी आणला. आणि याठिकाणी वृद्धेवर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आला आहे.

(हे वाचा-मुलीने विवाहाला नकार दिला म्हणून बापाने केली हत्या; अंत्यसंस्कारही उरकले)

कोरोना बाधित आजी हॉस्पिटल मध्ये दाखल का झाल्या नाहीत? म्हणून आरोग्य विभागाकडून चौकशी करण्यात आली. त्यांनतर हा सर्व प्रकार समोर आला. अंत्यसंस्कार झालेली आजी कोरोना बाधित असल्याचं कळताच गावकऱ्यांना धक्का बसला आहे. अंत्यसंस्कारासाठी आलेल्या 40 जणांची कोरोना चाचणी केली असता त्यातील 9 जण कोरोना बाधित आढळले आहेत. गावकऱ्यांना अंधारात ठेवून गुप्तपणे कोरोना बाधित आजीवर अंत्यसंस्कार केल्याने गावात संताप व्यक्त केला जात आहे. मात्र अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

First published:

Tags: Corona spread, Satara