मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

देशावर Corona च्या चौथ्या लाटेचं सावट..! राजधानी दिल्लीनं वाढवलं टेन्शन; Positive रुग्णांचा आलेख चढता

देशावर Corona च्या चौथ्या लाटेचं सावट..! राजधानी दिल्लीनं वाढवलं टेन्शन; Positive रुग्णांचा आलेख चढता

Corona Latest Update: देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. (Delhi Corona) यामुळे पुन्हा एकदा भीतीचे वातावरण तयार झाले आहे. रविवारी दिल्लीत कोरोनाच्या 517 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली.

  • Published by:  News18 Desk

दिल्ली, 18 एप्रिल : देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. (Delhi Corona) यामुळे पुन्हा एकदा भीतीचे वातावरण तयार झाले आहे. रविवारी दिल्लीत कोरोनाच्या 517 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. यामुळे पॉझिटिव्हिटी दर हा 4.21 टक्क्यांवर पोहोचला आहे. राजधानीत ज्याप्रकारे कोरोनाच्या रुग्णसंख्येत (Corona Patients in India) वाढ होत आहे, त्यावरुन कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यताही वाढली आहे. तर तेच दुसरीकडे आरोग्य क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवरुन आताच काही भाष्य करणे हे योग्य नाही. ते घाईचे ठरेल.

तर ते सरकारचे म्हणणे आहे की, अजून घाबरायची काहीही आवश्यकता नाही. कारण रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णसंख्येचे प्रमाण कमी आहे. तर तेच होम क्वारंटाईन होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. दिल्लीत शनिवार्यंत 772 रुग्ण हे होम क्वारंटाईन होते. त्यांच्या संख्या रविवारी वाढून 964 इतकी झाली आहे. तेच 1 एप्रिलला होम क्वारंटाईनमध्ये असलेल्यांची संख्या ही 332 इतकीच होती. मात्र, त्यांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

दिल्लीत गुरुवारी 325 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली. तर पॉझिटिव्हिटी दर हा 2.39 टक्के इतका होता. तर तेच शुक्रवारी 366 बाधितांची नोंद करण्यात आली. यानंतर शनिवारी 461 नवीन बाधितांची नोंद करण्यात आली. रविवारी पॉझिटिव्हिटी दर हा कमी झाला. मात्र, 50 हून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. कोरोना चाचण्यांमध्ये घट झाली आहे. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, 5 टक्क्यांपेक्षा जास्त कोरोना रुग्णसंख्येचा दर हा धोकादायक आहे.

हेही वाचा - केंद्र सरकारकडून राज ठाकरेंना विशेष सुरक्षा पुरवली जाणार?

मुलांकडे लक्ष देणे आवश्यक - 

यासोबतच कोरोनाचे संकटात लहान मुलेही सापडल्याचे दिसत आहे. शाळांमध्ये विद्यार्थी पॉझिटिव्ह आल्यानंतर दिल्ली सरकारने एक मार्गदर्शिका जारी केली आहे. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, घाबरण्याचे काही कारण नाही. मागची आकडेवारी सांगते की, मुलांना कोरोनाची लागण झाली तरी उपचाराने ते लवकर बरे होतात. कोरोनातज्ञ डॉ. चंद्रकांत लहारिया हे म्हणाले आहेत की, शाळा सुरू झाल्यामुळे मुलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

मास्क अनिवार्य करावा - 

तसेच आयसीएमआरचे एडीजी म्हणाले की, कोरोना पसरण्यासाठी शाळा जबाबदारी नाही. मास्क वापरणे तसेच कोरोनाच्या नियमावलीचे पालन करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले आहेत. अनेक तज्ञ म्हणाले आहेत की, तिसऱ्या लाटेनंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाली. यानंतर नियमावली हटवण्यात आली. त्यामुळे लोकांचा बेजबाबदारपणाही वाढला आहे. मास्क वापरालया हवा, असे डॉक्टर्सचे म्हणणे आहे. दिल्ली सरकारने 2 एप्रिलपासून मास्क वापरण्यावरुन बंदी उठवली आहे. यानंतर रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे मास्क बंधनकारक करण्यात यावा. तसेच कोरोनाच्या नियमावलीचे पालन करणे सक्तीचे करण्यात यावे, असे तज्ञांनी सुचवले आहे.

First published:

Tags: Corona, Corona spread, Corona updates, Coronavirus cases, Delhi