मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

चीनमध्ये कोरोनाचा कहर, शांघायमध्ये लॉकडाऊननंतर पहिला मृत्यू, लस न घेणाऱ्यांना मोठा फटका!

चीनमध्ये कोरोनाचा कहर, शांघायमध्ये लॉकडाऊननंतर पहिला मृत्यू, लस न घेणाऱ्यांना मोठा फटका!

(Photo - Social Media)

(Photo - Social Media)

चीनमधील शांघाय या शहराला कोरोनाचा मोठा फटका बसत आहे. (corona patients in china) रविवारी याठिकाणी तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. शहरात लावण्यात आलेल्या लॉकडाऊन (lockdown) नंतर हा पहिला मृत्यू आहे

  • Published by:  News18 Desk

शांघाय (चीन), 18 एप्रिल : चीनमधील शांघाय या शहराला कोरोनाचा मोठा फटका बसत आहे. (corona patients in china) रविवारी याठिकाणी तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. शहरात लावण्यात आलेल्या लॉकडाऊन (lockdown) नंतर हा पहिला मृत्यू आहे, असा दावा येथील स्थानिक प्रशासनाने केला आहे. तसेच शून्य मृत्यूच्या दाव्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. 2019 मध्ये वुहानमध्ये कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर शांघाय चीनमधील सर्वात जास्त कोरोनाच्या रुग्णसंख्येचं शहर झालं आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शांघायमध्ये ज्या तीन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला त्यात दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. मृत महिलांचे वय अनुक्रमे 89 आणि 91 होते तर पुरुषाचे वय 91 इतके होते. त्यांना आधीपासूनच हृदयरोग, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारखे अनेक आजार होते. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती आणखीच गंभीर झाली होती. तसेच त्यांनी कोरोनाची लसदेखील घेतली नव्हती, अशी माहिती शांघाय मनपाने दिली आहे.

याआधी मार्चच्या मध्यात उत्तर-पूर्व जिलिन प्रांतमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता. याला चीनमधील मागील एका वर्षात पहिला मृत्यू असे सांगण्यात आले होते. दरम्यान, इतक्या कमी मृत्यूसंख्येवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. बीबीसीच्या एका अहवालात दावा करण्यात आहे की, शांघायमधील एका रुग्णालयात एका आठवड्याच्या आत कमीत कमी 27 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यातील कोणीच कोरोनाची लस घेतली नव्हती.

हे वाचा - Coronaमुळे एकूण किती मृत्यू झाले?; भारताने WHO वर उठवले प्रश्न, म्हणाले, ''तुमची मोजण्याची पद्धत...''

शांघायमध्ये कडक लॉकडाऊन

शांघाय मनपातील आरोग्य विभागाचे आयुक्तांनी सांगितले की, रविवारी मागील 24 तासांच्या आत 3238 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.  शिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कोणतीही लक्षणे नसलेल्या 21,582 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. शांघायमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लोकांच्या घराबाहेर पडण्यावर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. किरकोळ लक्षणे दिसली तरी क्वारंटाईन करण्याच्या सूचना आहेत. तरीही रुग्णसंख्या वाढत आहे. क्वारंटाईन सेंटरमधील जागा कमी पडत असल्याची स्थिती आहे. लोक त्यांच्या घराच्या आणि अपार्टमेंटच्या खिडक्यांमधून ओरडताना दिसत आहेत, असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

चीनमधील किमान 44 शहरांमध्ये पूर्ण किंवा आंशिक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. 1 मार्चपासून चीनच्या 31 प्रांतांमध्ये 3 लाख 20 हजार कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे, माहिती सीएनएनने एका अहवालात दिली आहे.

First published:

Tags: China, Corona, Coronavirus cases